IND vs ENG रोहितसोबत रितिकाही झालीये क्वारंटाईन, हिटमॅननं शेअर केली स्टोरी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 29 January 2021

टीम इंडियातील काही खेळाडूंनी चेन्नई कसोटीला जाताना आपल्या कुटुंबियांना सोबत नेले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिले दोन्ही कसोटी सामने चेन्नईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाचे सर्व खेळाडू 27 जानेवारीला चेन्नईमध्ये पोहटले आहेत. सर्वांची कोरोना चाचणी झाली असून सर्वच खेळाडूंचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. टीम इंडियातील काही खेळाडूंनी चेन्नई कसोटीला जाताना आपल्या कुटुंबियांना सोबत नेले आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन यासंदर्भातील फोटो शेअर केले आहेत.

 Image may contain: 2 people, beard and ocean, text that says 'XX QUARAN- TEAM'

रोहितने आपल्या इन्स्टा स्टोरीला रितिकासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघे एकमेकांसोबत वेळ घालवत असताना दिसते. रितिकासोबतच्या फोटोला रोहितने 'क्वारंटीम' असं कॅप्शनही दिलंय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्माने संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र मोठी खेळी साकारण्यात तो अपयशी ठरला होता. घरच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध त्याच्या फलंदाजीत धमक पुन्हा दिसावी, अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा असेल.


​ ​

संबंधित बातम्या