INDvsENG : सक्सेसफुल DRS वर पंतला बाउंड्री का मिळाली नाही?

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 27 March 2021

भारतीय डावातील 40 व्या षटकात पंतच्या बॅटची कड घेऊन चेंडू सीमारेषेपलीकडे गेला. पण बाउंड्री मिळाली नाही.

India vs England, 2nd ODI : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली आहे. 336 धावा करुन टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पुण्याच्या मैदानातील रिषभ पंतच्या वादळी खेळीसोबतच त्याने घेतलेला DRS आणि त्यावर कॅन्सल करण्यात आलेली बॉउंड्री हा देखील चर्चेचा विषय ठरतोय.  

भारतीय डावातील 40 व्या षटकात पंतच्या बॅटची कड घेऊन चेंडू सीमारेषेपलीकडे गेला. यावेळी इंग्लंडकडून एलबीडब्लूची अपील करण्यात आली. मैदानातील पंचांनी बाद घोषीत केल्यानंतर पंतने DRS घेतला. रिप्लायमध्ये चेंडूने बॅटची कड घेतल्याचे दिसून आल्यामुळे पंतला नॉट आउट देण्यात आले. पण पंतला ती बाउंड्री मिळाली नाही. 

इंग्लड विरुद्धच्या  दुसऱ्या वनडेत दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी पंतला संधी देण्यात आली होती. या संधीच सोन करत त्याने धमाकेदार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. पंतने 40 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकाराच्या मदतीने 77 धावांची खेळी केली होती. ही खेळी भारतीय संघाला विजय मिळवून देण्यास पुरेशी ठरली नाही. 

INDvsENG : थर्ड अंपायरने स्टोक्सला दिले नॉट आउट, कोहली झाला नाराज​

या नियमामुळे पंतची बाउंड्री झाली कॅन्सल

क्रिकेटच्या नियमावलीनुसार, अंपायरने फलंदाजाला बाद दिले तर या चेंडूवरील धावा काउंट केल्या जात नाहीत. पहिल्यांदा अंपायर्संनी त्याला बाद दिले होते. त्यामुळे त्याला चार धावा मिळाल्या नाहीत. या नियमावरुनही आता सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. सॉफ्ट सिग्नलच्या वादानंतर आता या नियमात घोळ असल्याचे बोलले जात आहे.  

काय आहे सॉफ्ट सिग्नलचा वाद

मैदानातील अंपायरला फलंदाज बाद असल्याबद्दल संशय असला तर तो सॉफ्ट सिग्नच्या रुपात निर्णय देऊ शकतो. जर थर्ड अंपायरलाही निर्णय घेण कठिण होत असेल तर मैदानातील अंपायरने दिलेल्या कॉल फायनल मानला जातो. जर मैदानातील अंपायरला संशय असेल तर त्यान आउट न देता थर्ड अंपायरकडे जावे, असा युक्तीवाद झाला आहे.


​ ​

संबंधित बातम्या