INDvsENG : बार बार देखो; पंतने मारलेल्या फटक्यावर जिमीही झाला आवाक (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 5 March 2021

आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर पंतने परिपक्वता दाखवत सुरुवातीला संयमी खेळ केला.

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. रोहित शर्मा 49 धावांवर माघारी फिरल्यानंतर संकटात अडकलेल्या भारतीय संघाला पंत-वॉशिंग्टन जोडीने बाहेर काढले. दोघांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. नव्या चेंडूवर दोघांनी धआवांची बरसात केली. अर्धशतकासाठी 80 पेक्षा अधिक चेंडू  घेणाऱ्या रिषभ पंतने षटकाराने कसोटीतील शतकाला गवसणी घातली. 

आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर पंतने परिपक्वता दाखवत सुरुवातीला संयमी खेळ केला. त्याला वॉशिंग्टन सुंदरने उत्तम साथ दिली. जिमी अँडरसनला त्याने एक खणखणीत चौकार लगावला तो कसोटीतील दुर्मिळ प्रकाराचा शॉट होता. टी-20 मध्ये आपल्याला ज्या पद्धतीने आडवी तिडवी फटकेबाजी पाहायला मिळते त्याच धाडणीचा एक शॉट पंतने जिमीच्या गोलंदाजीवर खेळला. 6०० हून अधिक विकेट घेणाऱ्या जलदगती गोलंदाजही पंतने मारलेला फटका पाहून आवाक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानेच रिषभ पंतच्या खेळीला ब्रेक लावला. पंतने 101 धावांची दमदार खेळी केली. 

INDvsENG : अर्धशतक हुकले; पण जे विराटला जमलं नाही ते रोहितनं करुन दाखवलं

पंतने 118 चेंडूत 101 धावा केल्या. यात 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. अर्धशतक झळकावण्यासाठी 85 चेंडू घेणाऱ्या पंतने अखेरच्या टप्प्यात गियर बदलला. 50 धावा पूर्ण केल्यानंतर तो आक्रमक फटकेबाजी करताना पाहायला मिळाले. पुढच्या 33 चेंडूत त्याने शतक साजरे केले. यात त्याने अँडरसन आणि बेन स्टोक्स यांचा खरपूस समाचार घेतला.  


​ ​

संबंधित बातम्या