Ind vs Eng: पदार्पणाच्या सामन्यात इशान किशनचा धमाकेदार विक्रम

सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 14 March 2021

इशान किशनला संघात शिखर धवनच्या जागी स्थान मिळाले. त्याने ३२ चेंडूत ५६ धावा करण्याचा पराक्रम केला.

Ind vs Eng 2nd T20: भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या मोटेरा मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय मिळवला. लोकेश राहुल शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि इशान किशन दोघांनी डाव सावरला. इशान किशनने फटकेबाजीला सुरूवात केली तेव्हा विराटने संयमी खेळी केली. इशान किशनने ३२ चेंडूत अर्धशतक ठोकलं. या अर्धशतकाच्या जोरावर इशान किशनने एक विक्रम आपल्या नावे केला.

पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा इशान किशन केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला. इशान किशनने ५ चौकार आणि ४ षटकार ठोकत आपलं अर्धशतक झळकावलं. याआधी केवळ मुंबईकर अजिंक्य रहाणेने ही किमया साधली होती. २०११ मध्ये अजिंक्य रहाणेने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं. त्याने ६० धावा केल्या होत्या. त्यानंतर असा पराक्रम करणारा इशान दुसराच खेळाडू ठरला.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर जेसन रॉयची ४६ धावांची खेळी आणि इतर खेळाडूंच्या छोटेखानी खेळी यांच्या जोरावर इंग्लंडने २० षटकात ५ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने नाबाद ७३ धावा केल्या. तर इशान किशनने ५६ धावांची खेळी केली. लोकेश राहुल शून्यावर तर ऋषभ पंत २६ धावांवर बाद झाला.


​ ​

संबंधित बातम्या