INDvsENG : आम्ही तीन दिवसांत हरलो तेव्हा कोणी खेळपट्टी बघायला गेले नव्हते : विराट कोहली

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 3 March 2021

आम्ही खेळपट्टीवर तक्रार न करता चांगला खेळ करण्यावर भर दिला. याचा आम्हाला फायदा होत आहे. आम्ही पुढेही खेळपट्टीकडे बोट न दाखवता परिस्थितीनुसार खेळत राहू, असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय.  

भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli)  इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी खेळपट्टीवरुन (India vs England Pitch Controversy) चाललेल्या वादावर मोठे वक्तव्य केले. आम्ही जेव्हा न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या दिवशी अवघ्या 36 धावांत बाद झालो त्यावेळी खेळपट्टीवर नाही तर आमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, असा दाखला देत खेळपट्टीवरुन आरडा ओरड करण्यापेक्षा खेळावर फोकस करा, असा सल्ला त्याने प्रतिस्पर्धी संघाला दिलाय. 

कोहली म्हणालाला की, आम्ही जेव्हा न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झालो त्यावेळी खेळपट्टीवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले नव्हते. चेंडू किती स्विंग होत होता. खेळपट्टीवर किती गवत होते. हे पाहायला कोणीही आले नव्हते. आम्ही खेळपट्टीवर तक्रार न करता चांगला खेळ करण्यावर भर दिला. याचा आम्हाला फायदा होत आहे. आम्ही पुढेही खेळपट्टीकडे बोट न दाखवता परिस्थितीनुसार खेळत राहू, असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय.  

#SachinUnacademyFilm: अपयशानंतरचे सुंदर यश; प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल

सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली पुढे म्हणाला की, प्रत्येकाने प्रामाणिकपणे विचार करायला हवा. गुलाबी चेंडूवर फलंदाजांसाठा संघर्ष करावा लागला का? या प्रश्नावरही त्याने उत्तर दिले. चेंडू आणि खेळपट्टी यावरुन चर्चा का सुरुय हेच मला समजत नाही. दोन्ही संघातील फलंदाज अपयशी ठरले, याचा विचार करायला हवा, असे त्याने पुन्हा एकदा म्हटले. अहमदाबाद कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत निकाली लागला होता. या सामन्यानंतर खेळपट्टीसंदर्भात वक्तव्य न करता विराट कोहलीने फलंदाजांना मैदानात तग धरण्यात अपयश आल्याचे म्हटले होते. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्सनी विजय नोंदवत मालिकेत आघाडी घेतली होती.  

पिंक चेंडू आणि रेडू चेंडुवर त्याने मजेशीर उत्तर दिले. चेंडूचा रंग कोणताही असला तरी चेंडू गोलच असतो. त्यामुळे रंग बदलल्यामुळे फार फरक पडतो, असे मला वाटत नाही. चेन्नईची खेळपट्टी वेगळी होती. मोटेरा पिच सामान्यत: अधिक जलद आहे. मातीमुळे चेन्नई आणि अहमदाबादमधील खेळपट्टीत अंतर जाणवते. चेंडू बदलल्यामुळे फार काही फरक पडेल असे वाटत नाही, असेही त्याने म्हटले आहे. सामन्याचा निकाल दोन दिवसांत संपल्यानंतर काय विचार मनात आला, असा प्रश्नही कोहलीला विचारण्यात आला होता. यावर कोहली म्हणाला की, आम्ही जिंकण्यासाठी खेळतो. लोकांनाही भारताच्या विजयाचा आनंद वाटतो. प्रत्येक सामना दोन दिवसांत संपत नाही. टीम खराब खेळली तर निकाल दोन दिवसांत लागतो, यावर त्याने अधिक भर दिला.  
 


​ ​

संबंधित बातम्या