Ind vs Eng : अजिंक्यला बोल्ड करताच अँड्रसनच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 9 February 2021

पाहुण्या इंग्लंड संघाने पहिल्या डावातील 578 आणि दुसऱ्या डावातील 178 धावांच्या जोरावर टीम इंडियासमोर विजयासाठी 420 धावांचे आव्हान ठेवले आहे

Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या छायेत आहे. चेन्नई कसोटीच्या अखेरच्या दिवशी जेम्स अँड्रसनने आपल्या अनुभवाच्या जोरावर भारताच्या भरवशाच्या फलंदाजांच्या दांड्या उडवत टीम इंडियाला संकटात आणले. 

30 वर्षीय जिमीने या सामन्यात एक खास वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. वयाच्या तिशीनंतर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो आता अव्वलस्थानी पोहचलाय. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार कर्टनी वॉल्श यांच्या नावे होता.   वॉल्श यानी वयाच्या तिशीनंतर 341 विकेट घेतल्या होत्या. अँड्रसनच्या नावे आता 343* विकेट झाल्या आहेत. 

नाणेफेक गमावणेच पराभवास निमंत्रण : अश्‍विन

अँड्रसनने पाचव्या दिवशी शुभमन गिल (50), अजिंक्य रहाणे (0) यांना अप्रतिम रिवर्स स्विंगवर क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर त्याने पंतला झेलबाद केले.  तिशीनंतर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅग्रा तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 287 विकेट घेतल्या आहेत.  रिचर्ड हेडली 276 विकेटसह चौथ्या स्थानावर आहेत.  

पाहुण्या इंग्लंड संघाने पहिल्या डावातील 578 आणि दुसऱ्या डावातील 178 धावांच्या जोरावर टीम इंडियासमोर विजयासाठी 420 धावांचे आव्हान ठेवले आहे. एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवातच खराब झाली. रोहित शर्मा चौथ्या दिवसाअखेरच बाद झाला. अखेरच्या दिवशी लीचने पुजाराच्या रुपात भारतीय संघाला दुसरा धक्का दिला. अँड्रसनने एकाच षटकात अर्धशतकी केलेल्या शुभमन गिलला बोल्ड केले. त्याच षटकात त्याने अजिंक्य रहाणेलाही माघारी धाडले. त्याचे हे दोन सामन्याचा निकाल इंग्लंडच्या बाजूनं लावण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. 


​ ​

संबंधित बातम्या