INDvsENG : चायनामॅन कुलदीप पुन्हा बाकावर; विराटवर गंभीर आरोप

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 5 February 2021

कर्णधार विराट कोहली, ईशांत शर्मा यांच्या कमबॅकसोबत आणखी  एक मोठा बदल टीम इंडियाच्या इलेव्हनमध्ये पाहायला मिळाला.

चेन्नईच्या एम चिदम्बरम स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना सुरु आहे. जवळपास एका वर्षानंतर भारतीय मैदानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट अनलॉक झाले. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात अनुभवी फिरकीपटू अश्विनसोबत कुलदीप यादवला संधी मिळेल, असा अंदाज होता. मात्र त्याला पुन्हा बाकावर बसण्याची वेळी आली. कर्णधार विराट कोहली, ईशांत शर्मा यांच्या कमबॅकसोबत आणखी  एक मोठा बदल टीम इंडियाच्या इलेव्हनमध्ये पाहायला मिळाला. शहबाज नदीमला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. कुलदीप यादवशिवाय  मोहम्मद सिराजलाही इंग्लंडविरुद्दच्या पहिल्या सामन्यात संधी देण्यात आलेली नाही. 

कुलदीप यादव ऐवजी  शाहबाज नदीमला संघात स्थान दिल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात प्रतिक्रिया उमटत असून विराट कोहलीवर कुलदीपचे करियर खराब करण्याचा आरोप नेटिझन्सकडून करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दमादार कामगिरी करणाऱ्या सिराजला बाकावर बसवण्याचा निर्णयही क्रिकेट चाहत्यांना रुचलेला नाही.  
 

जानेवारी 2019 पासून कुलदीप संधीपासून वंचित  

कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ने  जानेवारी  2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात दिमाखदार कामगिरी करणाऱ्या ताफ्यातही कुलदीप होता. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. कुलदीपने आतापर्यंत 6 कसोटी सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या