INDvsENG : ती खेळपट्टीवरुन 'रडारड' नव्हती का? वॉनचा विराटवर प्रश्नांचा मारा

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 3 March 2021

पहिल्या कसोटी सामन्यानंतर ग्राउंडमॅनला हटवण्यात आल्याच मी ऐकले आहे. पिच सपाट असल्यामुळे ही कृती झाली. हे खळपट्टीवरुन रडगाणं नव्हते का? असा प्रश्न वॉनने ट्विटरच्या माध्यमातून उपस्थितीत केलाय.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारतीय संघाच्या कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवरुन केलेल्या वक्तव्यावर पलटवार केलाय. आम्ही पिचवरुन रडत बसलो नाही हाच आमच्या यशाचा मंत्र आहे, असे विराट कोहलीने म्हटले आहे. विराटने पत्रकार परिषदेत खेळपट्टीसह चेंडूवरुन भाष्य केले होते. चेंडू बदलल्याचा काही फरक पडत नाही, असेही तो म्हणाला. त्याच्या या वक्तव्यानंतर वॉनने ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.  

पहिल्या कसोटी सामन्यानंतर ग्राउंडमॅनला हटवण्यात आल्याच मी ऐकले आहे. पिच सपाट असल्यामुळे ही कृती झाली. हे खळपट्टीवरुन रडगाणं नव्हते का? असा प्रश्न वॉनने ट्विटरच्या माध्यमातून उपस्थितीत केलाय. याशिवाय चेंडूवरुन तक्रार केलेल्या घटनेचा उल्लेख करणारे ट्विटही मायकल वॉनने केले आहे. 

INDvsENG : आम्ही तीन दिवसांत हरलो तेव्हा कोणी खेळपट्टी बघायला गेले नव्हते : विराट कोहली

चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने एमए चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीची देखरेख करणाऱ्या पिच क्युरेटरला हटवले होते. या निर्णयानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने स्थानिक   ग्राउंडमन व्ही. रमेश कुमार यांच्या देखरेखीखाली खेळपट्टी तयार केली होती. रमेश कुमार यांच्याकटे चेन्नई कसोटीपूर्वी प्रथण श्रेणीसाठी खेळपट्टी तयार करण्याचाही अनुभव नव्हता.  

#SachinUnacademyFilm: अपयशानंतरचे सुंदर यश; प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल

भारतीय क्रिकेट मंडळाने अनुभवी क्यूरेटर तपोश चटर्जी यांना पहिल्या सामन्यानंतर विजय हजारे ट्रॉफीसाठी पिच तयार करण्याची जबाबदारी दिली. बीसीसीआयकडे क्यूरेटर्सचे मोठे पॅनेल आहे. तरीही तपोश यांच्या जागी अनुभव नसलेल्या क्यूरेटरची नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. पहिल्या पराभवानंतर भारतीय संघाने फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर जोरदार कमबॅक करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या