INDvsENG : रणनिती बदला नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल; मायकल वॉनचा टीम इंडियाला सल्ला

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 27 March 2021

इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन वनडे सामन्यात भारतीय संघाने संयमी सुरुवात करत अखेरच्या दहा षटकात तुफान फटेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारतीय संघाच्या रननितीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. भारतीय संघाने आपली रणनिती बदलली नाही तर दोन वर्षांनी घरच्या मैदानावर होणाऱ्या मर्यादित षटकांच्या (50 ओव्हर्स) वर्ल्डकपमध्ये याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे वॉनने म्हटले आहे. भारतीय संघ नेहमीच सुरुवातीच्या 40 षटकात संयमी खेळ करण्यावर भर देऊन अखेरच्या 10 षटकात अधिक धावा करण्याची रणनिती अवलंबतो. पुण्यातील दुसऱ्या वनडेत विश्वविजेत्या इंग्लंडने त्यांना हे किती महागात पडू शकते हे दाखवले. फलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर सुरुवातीपासून आक्रमक खेळ करावा लागतो. इंग्लंडने तसा खेळ करुन सामना जिंकून दाखवला, याचा उल्लेख मायकल वॉन याने केला आहे. 

INDvsENG : वनडे दरम्यान पुण्याच्या टेकडीवर रंगला होता सट्टेबाजीचा खेळ

इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन वनडे सामन्यात भारतीय संघाने संयमी सुरुवात करत अखेरच्या दहा षटकात तुफान फटेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या वनडेत अखेरच्या 10 षटकात 112 धावा करणाऱ्या टीम इंडियाने दुसऱ्या वनडेत अखेरच्या 60 चेंडूत 126 धावा कुटल्या होत्या.  वॉनच्या मतानुसार,  विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पाटा खेळपट्टीवर (सपाट खेळपट्टीवर) 375 धावांपर्यंत मजल मारु शकते. यासाठी त्यांना सुरुवातीपासून आक्रमक खेळ करावा लागेल. पहिल्या 40 षटकातील संयमी खेळीचा टीम इंडियाला दोन वर्षांनी होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये मोठा फटका सहन करावा लागू शकतो.  

INDvsENG : थर्ड अंपायरने स्टोक्सला दिले नॉट आउट, कोहली झाला नाराज​

पुण्याच्या मैदानातील दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेग जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने या सामन्यात 6 गड्यांच्या मोबदल्यात 336 धावा केल्या.  मात्र इंग्लंडने अवघ्या 43.3 षटकात आव्हान परतवून लावले. जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी  175 धावांची भागीदारी करुन इंग्लंडला मालिकेत बरोबरी करुन देण्यात मोलाचा वाटा उचलला. 
 


​ ​

संबंधित बातम्या