INDvsENG : अनुष्कानं शेअर केला 18 नंबर जर्सीतील 'ड्युप्लिकेट' विराटचा फोटो

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 5 March 2021

 विराट कोहली (Virat Kohli) सारखे दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. विराट कोहली शुन्यावर बाद झाल्यानंतर खराब रेकॉर्डवरुन  ट्रेंडिंगमध्ये असताना अनुष्का नावाच्या एका युजर्सने शेअर केलेल्या ड्युप्लिकेट विराटच्या फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगल्याचे दिसते.

INDvsENG : अर्धशतक हुकले; पण जे विराटला जमलं नाही ते रोहितनं करुन दाखवलं

भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या आवारात  विराट कोहलीसारखा दिसणारा एक तरुण आल्याचे पाहायला मिळाले. त्याला पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.  विराट कोहली (Virat Kohli) सारखे दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 18 नंबरची जर्सी घालून तो मैदानात सामना पाहण्यासाठी आला होता.  

विराट कोहलीच्या चेहऱ्याशी मिळता जुळता चेहरा असणारा व्यक्ती स्टेडियमवर दिसल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही विराट कोहलीच्या चेहरापट्टीशी मिळता जुळता चेहरा असणाऱ्या तरुण भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात पोहचल्याचे पहायला मिळाले होते.  


​ ​

संबंधित बातम्या