INDvsENG: विराटचा 'लाडला' पुन्हा फ्लॉप; चार डावात तिसऱ्यांदा भोपळा!

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 16 March 2021

मार्क वूडने लोकेश राहुलच्या दांड़्या उडवल्या. त्याला खातेही उघडता आले नाही. मागील चार डावात तिसऱ्यांदा लोकेश राहुल शून्यावर बाद झालाय.

आयसीसीच्या टी-20 फलंदाजांच्या  रँकिंगमध्ये पहिल्या दहामध्ये केवळ दोन भारतीय आहेत. त्यात KL राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांचा समावेश आहे. या रँकिंगमध्ये रनमशिन विराटपेक्षाही उजवा असलेल्या लोकेश राहुल मागील काही सामन्यांपासून सातत्याने अपयशी ठरताना दिसतोय. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याला फ्लॉप शो कायम दिसला. मार्क वूडने लोकेश राहुलच्या दांड़्या उडवल्या. त्याला खातेही उघडता आले नाही. मागील चार डावात तिसऱ्यांदा लोकेश राहुल शून्यावर बाद झालाय.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी-20 सामन्यात तो शुन्यावर बाद झाला होता. त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही तो नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. पहिल्या टी-20 सामन्यात त्याने खाते उघडले मात्र जोफ्रा आर्चरने त्याला एका धावेवर चालते केले. दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने सहा चेंडू खेळले. यात सॅम कुरेनने त्याला माघारी धाडेल. आणि तिसऱ्या सामन्यात मार्क वूडने त्याला शुन्यावर बाद केले. इंग्लंड विरुद्धची टी-20 मालिका ही आगामी वर्ल्ड कप (टी-20) ची तयारी मानली जात आहे. संघातील आपला दावा भक्कम करण्यासाठी राहुलला नावाला साजेसा खेळ करावा लागणार आहे.

ही महिला ठरणार क्रिकेटच्या मैदानातील खरी वाघीण; पुरुषांना देणार ट्रेनिंग

फ्लॉप ठरल्यानंतरही लोकेश राहुलला वारंवार संधी देण्यावरुन यापूर्वी विराटही अनेकदा ट्रोल झाला आहे. विराटचा लाडला असेही त्याला संबोधले जाते. तिसऱ्या सामन्यात जे बदल करण्यात आले त्यावेळी देखील कर्णधार कोहलीचे त्याच्यावरील प्रेम कायम दिसले. मागील सामन्यात फ्लॉप ठरुनही त्याला बाकावर बसवण्याऐवजी विराट कोहलीने एकही चेंडू न खेळलेल्या सुर्यकुमार यादवला बाहेर बसवले. या सामन्यानंतर आता लोकेश राहुलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत असून लोकेश राहुलला नेटकरी ट्रोल करतानाही पाहायला मिळत आहे. सातत्याने खराब कामगिरी त्याच्या रँकिंगवर परिणाम कारक ठरु शकते. एवढेच नाही तर आगामी लढतीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यातही त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. केएल राहुलने 47 टी-20 सामन्यात 40.61 च्या सरासरीने 1543 धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. हे आकडे त्याच्यातील क्षमता असल्याचे पुरावे असले तरी सध्याच्या घडीला तो संघर्ष करताना दिसत आहे.  


​ ​

संबंधित बातम्या