INDvsENG : अजिंक्य-विराटच्या कॅप्टन्सीवर पीटरसनची टिवटिव!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 2 February 2021

इंग्लंडच्या माजी कर्णधाराने स्टार स्पोर्ट्सच्या  'क्रिकेट कनेक्टेड' या कार्यक्रमात भारत-इंग्लंड यांच्यातील आगामी कसोटी मालिकेवर भाष्य केले.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणेनं नेतृत्वाची जबाबदारी लिलया पेलली. अंजिक्यच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत 2-1 असा दिमाखदार विजय नोंदवला. त्यानंतर आता भारतीय संघ नियमित कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झालाय. अजिंक्य रहाणेच्या यशानंतर कोहलीच्या नेतृत्वाची कसोटी असेल, अशा आशयाचे वक्तव्य इंग्लडच्या माजी क्रिकेटर केविन पीटरसनने केले आहे. 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जो संघ 36 धावांत ऑल आउट झाला त्याच संघाने मैदानात 328 धावांचे लक्ष्य पार करत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला. ऑस्ट्रेलियातील विजयानंतर अजिंक्य रहाणेकडे कसोटी संघाची धूरा द्यावी, असा सूरही उमटला. त्यानंतर आता पीटरसननेही यावर भाष्य केले आहे. 

 IPL 2021 Auction : या 3 अनकॅप्ड खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली

इंग्लंडच्या माजी कर्णधाराने स्टार स्पोर्ट्सच्या  'क्रिकेट कनेक्टेड' या कार्यक्रमात भारत-इंग्लंड यांच्यातील आगामी कसोटी मालिकेवर भाष्य केले. 5 फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या कसोटी मालिकेसंदर्भात पीटरसन म्हणाला की, या मालिकेत विराटची कॅप्टन्सी पाहण्याजोगी असेल. ऑस्ट्रेलिया अजिंक्य रहाणेनं कमालीच नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले. या मालिकेदरम्यान कॅप्टन-उप कॅप्टन यांच्यातील ताळमेळ कसा दिसेल, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाविषयीच्या चर्चा या मालिकेत पाहायला मिळेल, असेही पीटरनस म्हणाला.  विराट सध्याच्या घडीला यशस्वी कर्णधार आहे. दुसरीकडे  रहाणेनं आतापर्यंत 5 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यातील एक सामना अनिर्णित राहिला असून 4 सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून दिलाय. 


​ ​

संबंधित बातम्या