IND vs ENG: त्रिशतकासह ईशांत कपिल पाजी आणि झहीरच्या पंक्तीत

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 8 February 2021

भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे सर्वात अव्वलस्थानी आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ईशांत शर्माने मैलाचा पल्ला गाछला. पहिल्या डावात डोंगराऐवढ्या धावा उभारणाऱ्या पाहुण्या संघाला भारतीय गोलंदाजांनी सातत्याने धक्के देत नियंत्रणात ठेवले.  इंग्लंडच्या दुसऱ्या डावात डेनियल लॉरेन्सला बाद करत ईशांत शर्माने 300 विकेटचा टप्पा गाठला. असा पराक्रम करणारा भारताचा तो तिसरा जलदगती गोलंदाज ठरला.

भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकूण देणारे अष्टपैलू कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये  (434) विकेट घेतल्या आहेत. त्यांच्या पाठोपाठ झहीर खानचा नंबर लागतो.  झहीरच्या नावे (311) विकेट्स जमा आहेत. भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये  अनिल कुंबळे सर्वात अव्वलस्थानी आहेत. त्यांनी 132 सामन्यात 619 विकेट घेतल्या आहेत. फिरकीपटू हरभजन सिंगच्या नावे  417 विकेट आहेत. भारताकडून 300 + विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विनचाही समावेश आहे. 

Australian Open 2021 : सेरेनाचा हटके अंदाज; चर्चा तर होणारच (VIDEO)

चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार ज्यो रुटचे द्विशतक बेन स्टोक्स (82) आणि सिब्लेच्या (87) धावांच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात ईशांतने जोफ्रा आर्चर आणि जोस बटलरच्या रुपात दोन विकेट घेतल्या होत्या.   


​ ​

संबंधित बातम्या