INDvsENG : टीम इंडियाला मोठा धक्का; बुमराह संघाची साथ सोडून घरी परतला

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 27 February 2021

जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणास्तव दौऱ्यातून माघार घेण्यासंदर्भात विनंती केली होती, बीसीसीआयने त्याला परवानगी दिली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या आणि चर्चित नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहा इंग्लंड विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. वैयक्तिक कारणास्तव त्याने स्पर्धेतून माघार घेतली असून बीसीसीआयने त्याला संघातून रिलीज केले आहे. जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणास्तव दौऱ्यातून माघार घेण्यासंदर्भात विनंती केली होती, बीसीसीआयने त्याला परवानगी दिली आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेनंतर टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. यास्पर्धेपूर्वी टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी तो संघात परतणार का? यासंदर्भात तूर्तास कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 

मालिकेत बुमराहने 2 सामन्यात घेतल्या 4 विकेट्स
 

जसप्रित बुमराहने मालिकेत दोन कसोटी सामने खेळले आहेत. यातील 3 डावात त्याने 4 गड्यांना तंबूत धाडले. यात 84 धावा खर्च करुन घेतलेल्या 3 विकेट्सही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. चेन्नईच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात तो मैदानात उतरला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळाली. हा सामना भारतीय संघाने जिंकला. त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात सिराजला बाहेर बसवून पुन्हा बुमराह संघात आला. या सामन्यात भारतीय संघाने दोन दिवसांतच विजय नोंदवला होता. 


​ ​

संबंधित बातम्या