INDvsENG : स्टोक्स सिराजला नडला; मग विराट त्याला भिडला! (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 4 March 2021

इंग्लंडच्या डावातील 14 व्या षटकात सिराज आणि बेन स्टोक्स यांच्यात आँखो ही आँखो मे इशारे झाल्याचे पाहायला मिळाले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर सुरु आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाची आघाडी पुन्हा एकदा फोल ठरली आहे. सलामीवीर सिब्लेच्या रुपात अक्षर पटेलने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. त्याने 2 धावा केल्या. झॅक क्राउले 9 धावांची भर घालून परतल्यानंतर कर्णधार ज्यो रुटनेही मैदान सोडले. सिराजने ज्यो रुटला बाद केले.

इंग्लंडच्या डावातील 14 व्या षटकात सिराज आणि बेन स्टोक्स यांच्यात आँखो ही आँखो मे इशारे झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर कॅप्टन विराट कोहली आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स एकमेकांच्या अंगावर तावातावाने आले. मैदानातील पंचांनी मध्यस्थी करुन दोघांना आपापल्या जागी घालवले. दरम्यान दोघेही एकमेकांना काहीतरी म्हणत आपापल्या जागी गेले. 

अहमदाबादच्या मैदानात रंगलेला तिसरा कसोटी सामना दुसऱ्या दिवसांत संपला होता. त्यानंतर खेळपट्टीवरुन चांगलीच चर्चा रंगली होती. मैदानात प्रत्येक्षात खेळणाऱ्या ज्यो रुट कंपनीने खेळपट्टीवरुन फार काही टिपण्णी केलेली नाही. झॅक क्राउलने फिरकीला पुढे येऊन खेळण्याची हिंमत दाखवत इंग्लंडचे गडी आता अभ्यास करुन आल्याची झलक दाखवली. पण अक्षर पटेलच्या चेंडूवर प्रत्येक चेंडू पुढे येऊन खेळणे त्याला महागात पडले. एक खराब फटका खेळत त्याने सिराजच्या हाती सोपा झेल दिला. नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा इंग्लंडची खराब सुरुवात झाली आहे. बेन स्टोक्स आणि जॉन बेयरस्टो ही जोडी संघाच्या धावसंख्येत किती भर घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या