विराटनं बोल्ड झाल्यावर रोहितला विचारलं काय झालं? (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 13 February 2021

मोईन अलीच्या चेंडूवर त्रिफळा उडल्यावर कोहलीला काही वेळ यावर विश्वासाच बसला नाही.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील  (India vs England) दुसरा कसोटी सामना चेन्नईच्या मैदानात सुरु आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच सत्रात 3 धक्के बसले. सलामवीर शुभमन गिल आणि कर्णधार विराट कोहलीला तर खातेही उघडता आले नाही. पुजारा 21 धावा करुन माघारी फिरला. 

जॅक लीचने चेतेश्वर पुजाराला (21)  बाद केल्यानंतर विराट कोहली मैदानात आला. पाचव्या चेंडूवर मोईन अलीने त्याला बोल्ड केले. मोईन अलीच्या चेंडूवर त्रिफळा उडल्यावर कोहलीला काही वेळ यावर विश्वासाच बसला नाही. आपण बोल्ड झालोय यावर त्याला विश्वासच बसत नव्हता.  बाद झाल्यानंतर त्याची रिअ‍ॅक्शन अशीच काहीशी होती.  

INDvsENG : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील 'माहोल' बदलला (VIDEO)

कोविड- 19 (Covid- 19) च्या सकटानंतर क्रीडा क्षेत्र हळूहळू सावरत असताना पहिल्यांदाच चेन्नईच्या मैदानात प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना रंगला आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगणाऱ्या सामन्यात विराटला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले.  इंग्लंडच्या संघाविरुद्ध खेळताना विराट चौथ्यांदा शून्यावर बाद झालाय. 

विराट कोहलीचा त्रिफळा उडल्यानंतर इंग्लंडच्या संघातील खेळाडूंनी जल्लोष सुरु केला. त्यानंतर विराट कोहली नॉन स्ट्राईकवर असलेल्या रोहित शर्माला नेमकं काय झालं? असा प्रश्न विचारताना दिसले. यष्टिरक्षकाने स्टंपिंगकरण्याच्या हेतूने बेल्स उडवल्या असाव्यात असा विराटचा गैरसमज झाला. रोहितने त्याला बोल्ड झाल्याचे सांगितले. 


​ ​

संबंधित बातम्या