INDvsENG : टीम इंडिला रोहितच्या शतकाची साथ; रितिकासह प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर फुलवलं हास्य

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 13 February 2021

रितिकासह प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही रोहितच्या शतकाने हसू फुलवल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार कमबॅक केले. वनडेच्या अंदाजात 47 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने याचे शतकात रुपांतर केले. मोईन अलीच्या गोलंदाजीवर दोन धावा घेत त्याने शतक साजरे केले. व्हॅलेंटाईन डे पूर्वी त्याने रितिकाच्या साक्षीनं चेन्नईच्या मैदानात शतक झळकावत आपल्या नावाला साजेसा खेळ केला. 

2018 मध्ये 13 फेब्रुवारी रोजीच रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात शतकी धमाका केला होता. 126 चेंडूत 115 धावांची खेळी यावेळी त्याने केली होती. हे शतक त्याने आपली पत्नी रितिका सजदेह हिला डेडिकेट केले होते. विशेष म्हणजे आजच्या सामना पाहण्यासाठी रितिकाही प्रेक्षक गॅलरीमध्ये दिसली. रोहितला प्रोत्साहन देण्यासाठी ती बऱ्याचशा सामन्याला स्टेडियमवर हजेरी लावत असते. याही सामन्यात रितिकाची झलक पाहायला मिळाली. शतकानंतर तिने टाळ्या वाजवून हबीच्या शतकाचे सेलिब्रेशन केले. तिच्यासह प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही रोहितच्या शतकाने हसू फुलवल्याचे चित्र पाहायला मिळाले.

INDvsENG : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील 'माहोल' बदलला (VIDEO)

रोहित शर्माचे कसोटीतील हे सातवे शतक आहे. भारतीय संघाला पहिल्या सत्रातच धक्क्यावर धक्के बसल्यानंतर रोहित शर्माने संघाचा डाव सावरला. त्याने उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या साथीनं डाव सावरला.नव्वदी पार केल्यानंतर त्याने एक उत्तुंग षटकार खेचला आणि 97 धावांवर पोहचला. पुढील तीन धावा करण्यासाठी त्याने पुन्हा सावध पवित्रा घेत शतकाला गवसणी घातली. 


​ ​

संबंधित बातम्या