INDvsENG : अर्धशतक हुकले; पण जे विराटला जमलं नाही ते रोहितनं करुन दाखवलं

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 5 March 2021

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हजारी पार करणारा रोहित दुसरा भारतीय फलंदाज आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात रोहित शर्माचे अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकले. 144 चेंडूत 49 धावा करुन रोहित बाद झाला. बेन स्टोक्सने त्याची विकेट घेतली. अर्धशतकाला हुलकावणी बसली असली तरी रोहित शर्माच्या नावे विश्वविक्रमाची नोंद झाली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 1000 धावा करणारा रोहित शर्मा पहिला सलामीवीर ठरलाय.  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली रोहित शर्मापेक्षा अधिक कसोटी सामने खेळूनही त्याला हजारी पार करता आलेली नाही. रोहितनं अवघ्या 11 सामन्यात ते करुन दाखवलं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हजारी पार करणारा रोहित दुसरा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी अजिंक्य रहाणेनं हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 2019 ते 2021 दरम्यानच्या कसोटी मालिकेतील आकडेवारीत विराट कोहली दहाव्या क्रमांकावर आहे.  

NZvsAUS : खराब खेळीनंतर पत्नीला धमकावले; फिंचने स्फोटक फलंदाजीनं दिलं उत्तर (VIDEO)

मार्नस लाबुशेनने 13 सामन्यात  1675 धावा केल्या आहेत. यात त्याने 5 शतकासह 9 अर्धशतकाचा समावेश आहे. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने 20 कसोटी सामन्यात 1630 धावा केल्या आहेत. यात 3 शतकासह दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावर   स्टीव स्मिथ आहे.  त्याने 1341 धावा केल्या आहेत.  बेन स्टोक्स 1332 धावांसह चौथ्या स्थानावर आहे, अंजिक्य रहाणेनं 17 सामन्यात  1095 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 11 कसोटी सामन्यात 1030 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने आतापर्यंत 4 शतके आणि 6 अर्धशतके लगावली आहेत. रनमनिशन म्हणून ओळख असलेल्या विराट कोहलीने  14 कसोटी सामन्यात  877 धावा केल्या आहेत.  रोहित शर्माने इंग्लंड विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात संयमी खेळ केला. त्याने 49 धावांची खेळी केली. 

भारतीय संघाने चौथा कसोटी सामना जिंकला किंवा अनिर्णित राखला तर लॉर्ड्सवर होणाऱ्या फायनलमध्ये रोहित शर्माला आणखी एक संधी मिळेल. यात तो आपल्या धावसंख्येत आणखी भर घालू शकले. याशिवाय दुसऱ्या डावात तो कशी कामगिरी करतोय हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. 


​ ​

संबंधित बातम्या