INDvsENG 4th Test Pich Prediction : फिरकीस साथ, पण नसेल ‘आखाडा’

 सुनंदन लेले  : सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 March 2021

या चौथ्या सामन्याच्या खेळपट्टीची तयारी करताना संयोजकांनी थोडे जास्त पाणी खेळपट्टी तयार करताना वापरून थोड्या जास्त वजनाचा रोलर जास्त काळ फिरवला आहे. त्यामुळे खेळपट्टी ठोस असेल. चौथा कसोटी सामना तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस खेळला जायला हवा यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत. 

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या खेळपट्टीने नवीन वास्तूपेक्षा जगभर नाव कमावले. त्याच मैदानावर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीची चर्चा जोर धरू लागली आहे. ही खेळपट्टी फिरकीस साथ देणारी असेल, परंतु आखाडा नसेल असे एका वाक्‍यात गुजरात क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

या चौथ्या सामन्याच्या खेळपट्टीची तयारी करताना संयोजकांनी थोडे जास्त पाणी खेळपट्टी तयार करताना वापरून थोड्या जास्त वजनाचा रोलर जास्त काळ फिरवला आहे. त्यामुळे खेळपट्टी ठोस असेल. चौथा कसोटी सामना तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस खेळला जायला हवा यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत. 

INDvsENG: मातीच्या ढेकळात बॅटिंग करत इंग्लिश दिग्गजानं केली पिचची भविष्यवाणी​
 

फिरकीसमोर हवा बचाव भक्कम :  रहाणे

फिरकी तसेच चांगल्या वेगवान गोलंदाजीला खेळताना बचाव भक्कम हवा आणि त्यावर तुमचा विश्‍वास हवा. चेंडूची दीशा सर्वांत मोलाची ठरते. फलंदाज क्रीजचा योग्य वापर कसा करतो, हे महत्त्वाचे ठरते. पायाचा वापर करून चेंडूपर्यंत जाण्याचे तंत्र कामी येऊ शकते, पण अखेर प्रत्येक फलंदाजाला आपले बलस्थान ओळखून उपाययोजना करावी लागते, असे रहाणेने सांगितले.

धक्का देण्याचा प्रयत्न करतील

चौथ्या सामन्यात चांगले क्रिकेट कसे खेळता येईल याचा विचार करतो आहोत. लाल चेंडूचा हा सामना असल्याने फरक पडेल. विकेट तिसऱ्या सामन्यासारखेच असेल. पारंपरिक लाल रंगाचा चेंडू वेगात येणार नाही, त्याचा फरक पडेल. अर्थातच इंग्लंड चांगला संघ आहे आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे. शेवटच्या कसोटीत ते जोरात धक्का देण्याचा प्रयत्न करतील जे आम्हाला अपेक्षित आहे, असेही रहाणेने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या