INDvsENG: सूर्या आउट नव्हताच! विराटच्या चेहऱ्यावरही दिसला हाच भाव

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 18 March 2021

टीव्ही रिप्लायमध्ये डविड मलान याने सूर्याचा झेल घेतलेला चेंडू जमीना स्पर्श झाल्याचे दिसत होते

आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यातील दुसऱ्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग मिळाल्यावर सुर्यकुमार यादवने आपल्यातील क्षमता सिद्ध केली. त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील पहिले वहिले अर्धशतक झळकावले. ही खेळी तो आणखी फुलवेल, असे वाटत असताना तो झेलबाद झाला. सॅम कुरेनच्या गोलंदाजीवर त्याने टोलावलेला फटका डेविड मलानने पकडला. फिल्ड अंपायरने सॉफ्ट डिसिजनमध्ये सूर्या बाद असल्याचा निर्णय दिला. थर्ड अंपायरने ज्यावेळी टीव्ही रिप्लायचा आधार घेतला त्यावेळी मैदानातील पंचाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. आणि सुर्यकुमार यादवला 31 चेंडूत 57 धावांवर असताना तंबूत परतावे लागले.

आपल्या या अर्धशतकी खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार खेचले. टीव्ही रिप्लायमध्ये डविड मलान याने सूर्याचा झेल घेतलेला चेंडू जमीना स्पर्श झाल्याचे दिसत होते. मात्र निर्णय घेण कठिण असल्यामुळे मैदानातील पंचाचा निर्णय ग्राह्य धरण्यात आला. डग आउटमध्ये बसलेल्या विराट कोहलीने देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्याच्या चेहऱ्यावरील भाव हे सूर्या नॉटआउटच होतो, हेच होते. सोशल मीडियावर यासंदर्भात चर्चा रंगली असून पंचाचा हा निर्णय वादग्रस्त असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या