वंदे मातरम गीत ऐकत इंग्लंड खेळाडूंची प्रॅक्टिस; स्टोक्सनं शेअर केला व्हिडिओ

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 20 February 2021

2014 पासून याठिकाणी एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झालेला नाही.

IND vs ENG 3rd Test Largest Cricket Stadium in Ahmedabad : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर रंगणार आहे. हा कसोटी सामना डे नाईट असून गुलाबी चेंडूवर खेळवण्यात येईल. तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ अहमदाबादच्या मैदानात सराव करत आहेत. जगातील सर्वात मोठ्या स्डेडियवर सराव करतानाचे  फोटो आणि व्हिडिओ दोन्ही संघातील खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहेत. ज्यावेळी इंग्लंडचे खेळाडूंचे ट्रेनिंग सेशन सुरु आहे त्यावेळी वंदे मातरम हे गीत सुरु असल्याचे ऐकायला येते. 

मोटेरामध्ये नव्याने उभारण्यात आलेले हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. 1 लाख 10 हजार प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडियमच्या उभारणीला 2015 पासून सुरुवात झाली होती. 2014 पासून याठिकाणी एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झालेला नाही. तिसऱ्या डे नाईट कसोटी सामन्याची जोरदार तयारी सुरु आहे.  

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तिसऱ्या मॅचसाठी संघ कसून सराव करताना दिसते. काही स्टेडियवर सराव करत असताना स्थानिक ठिकाणची धुन आम्हाला मदत करते.  त्याच्याशिवाय भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनेही मोटेरा स्टेडियमचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, ईशांत शर्मा, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल ही दिसले होते.  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी सामन्यातील पहिले दोन कसोटी सामने चेन्नईच्या मैदानात रंगले होते. अहमदाबादमध्ये होणाऱ्या दोन सामन्याने मालिकेचा निकाल स्पष्ट होणार आहे. सध्याच्या घडीला दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 कसोटी सामना जिंकला आहे.


​ ​

संबंधित बातम्या