IND vs ENG: शार्दुलच्या गगनचुंबी षटकारानंतर बेन स्टोक्सनं चेक केली बॅट (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 28 March 2021

निर्णायक सामन्यातील अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूरनं तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या निर्णायक वनडे सामन्यात शार्दुल ठाकूरने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. 30 धावांच्या आपल्या खेळीत शार्दुलने  3 षटकार आणि 1 चौकार खेचला. शार्दुलने अष्टपैलू बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवरही खरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. त्याने कोणतीही तमा न बाळगता बिनधास्त फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. 

शार्दुल फलंदाजी करत असताना एक क्षण असा पाहायला मिळाला की बेन स्टोक्स त्याच्या उत्तुंग फटकेबाजीनंतर त्याच्या बॅटकडे पाहताना दिसला. जणून तो शार्दुलची बॅट चेक करतोय, असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून शार्दुलच्या धमाकेदार फलंदाजीचे कौतुक होत आहे. पुण्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक गमावली. प्रथम फलंदाजी करताना रोहित आणि धवनने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. विराट कोहली आणि लोकेश राहुल स्वस्तात माघारी फिरल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रिषभ पंतने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. 

धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटनंतर सातासमुद्रापलिकडे फेमस होतोय पंतचा 'स्कूप शॉट' (VIDEO)

भारताकडून रिषभ पंतने 88 धावांची सर्वोच्च धावसंख्या केली. त्यापाठोपाठ शिखर धवनने 67 धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूरने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने  329 धावांपर्यंत मजल मारली. शार्दुल ठाकूरने आपल्या खेळीतील 3 षटकारांपैकी एक षटकार हा बेन स्टोक्सलाही लगावल्याचे पाहायला मिळाले.  

तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 37 धावा केल्या. कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी प्रत्येकी 7-7 धावा करुन तंबूचा रस्ता धरला. नाणेफेकीनंतर फलंदाजीत अपयशी ठरलेल्या विराट कोहलीने मैदानात उतरताच एक विक्रम आपल्या नावे केला. 200 आतंरराष्ट्रीय सामन्यात  भारतीय संघाचे नेतृत्व करणारा तो तिसरा कर्णधार ठरला आहे.


​ ​

संबंधित बातम्या