INDvsENG : रोहित-रहाणे याचा ‘आर’ फॅक्‍टर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 February 2021

नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्याचे समाधान वाटत असताना इंग्लंडचा नवोदित वेगवान गोलंदाज स्टोनने गिलला पायचीत बाद केल्यावर स्टेडियममध्ये वर्षभरानंतर परतलेल्या प्रेक्षकांना हा धक्का होता.

पहिल्या सामन्यात पूर्णतः अपयशी ठरल्यामुळे रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे यांच्यावर अतिरिक्त दडपण होते. त्यातच सलामीवीर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी भोपळाही न फोडल्यामुळे दडपणाचा हिमालय झाला होता; पण रोहित जेव्हा फॉर्मात येतो, तेव्हा खेळपट्टीचे स्वरूप आणि गोलंदाजी नगण्य असते. हे आज पुन्हा सिद्ध झाले. ज्या खेळपट्टीवर आठव्याच षटकापासून फिरकी सुरू झाली तेथे रोहितने फलंदाजी किती सहज आणि सोपी आहे, हे दाखवून दिले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी केलेली 162 धावांची भागीदारी इंग्लिश गोलंदाजांना विचारात 
टाकणारी होती. 

भारताची खराब सुरवात

नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्याचे समाधान वाटत असताना इंग्लंडचा नवोदित वेगवान गोलंदाज स्टोनने गिलला पायचीत बाद केल्यावर स्टेडियममध्ये वर्षभरानंतर परतलेल्या प्रेक्षकांना हा धक्का होता. रोहित शर्माने पुजारासह ८५ धावांची भागीदारी केली; परंतु पुजारा बाद झाल्यावर मोईन खानच्या झपकन वळलेल्या चेंडूवर विराट कोहली त्रिफळाचीत झाला. त्या वेळी स्टेडियममध्ये प्रेक्षक नसल्यासारखी शांतता पसरली होती. भारताची 3 बाद 86 अशी अवस्था झाली होती.

दृष्टीक्षेपात
    
*इंग्लंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या चार देशांविरुद्ध तिनही प्रकारात शतके करणारा रोहित शर्मा  पहिला फलंदाज

*कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताकडून रोहितची सर्वाधिक चार शतके.
   

*कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेत सलामीवीर म्हणून रोहितकडून सर्वाधिक शतके

*आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मायदेशात २०० षटकार मारणारा  रोहित पहिला भारतीय फलंदाज

*रोहितचे कसोटीतील सातवे शतक, चौथ्या क्रमांकाची 

*सर्वोत्तम खेळी
     
*जॅक लिच रिषभ पंतसाठी गिऱ्हाईक. आत्तापर्यंत त्याच्याकडून खेळलेल्या 30 पैकी 10 चेंडूंवर चौकार किंवा षटकार.
     

*विराट कोहली आणि अजिंक्‍य रहाणे यांना एकाच डावात त्रिफाळाचीत करणारा मोईन अली पहिला गोलंदाज


​ ​

संबंधित बातम्या