INDvsENG : वॉशिंग्टचं शतक हुकलं; पण 'सुंदर' षटकारानं जिंकलं (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 8 February 2021

 वॉशिंग्टनने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार खेचले.   

India Vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना (Ind Vs Eng 1st Test) चेन्नईच्या मैदानात सुरु आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा केल्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव 337 धावांत आटोपला. अश्विन आणि वॉशिंग्टनच्या खेळीमुळे भारतीय संघ फॉलो-ऑन वाचवण्यात यशस्वी ठरला. अष्टपैलू (Washington Sundar) ने 85 धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूनं त्याला साथ मिळाली असती तर त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतक पूर्ण केलं असतं.  वॉशिंग्टनने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार खेचले.   

दोन षटकारापैकी वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) जेम्स अँड्रसनला (James Anderson) लगावलेला षटकार अप्रतिमच होता. जागेवरुन टोलवलेला उत्तुंग फटक्याकडे अँड्रसन पाहतच राहिला. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

INDvsENG : पहिल्याच चेंडूवर अश्विनने इंग्लिश सलामीवीराला दाखवला तंबूचा रस्ता

पहिल्या डावात  भारताच्या धावफलकावर 8 बाद  312 धावा असताना वॉशिंग्टन आणि ईशांत शर्मा क्रिजवर होते. एका बाजून विकेट पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने आक्रमक पवित्रा घेत  धावफलक वेगाने हालवण्याचा प्लॅन आखला. यावेळी जेम्स अँड्रसनच्या चेंडूवर त्याने जागेवरुन समोरच्या दिशेने उत्तुंग फटका मारला. तो थेट सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला.  सुंदरच्या नाबाद 85 धावासह पंत 91 आणि पुजाराने 73 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून डोमिनिक बेसने 4 विकेट घेतल्या जेम्स अँड्रसन, जोफ्रा ऑर्चर आणि जॅक लीच यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.


​ ​

संबंधित बातम्या