INDvsENG: अजिंक्यला फेल ठरवणारा रुटचा अप्रतिम झेल पाहिलात का?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 7 February 2021

हिटमॅन रोहित अवघ्या 6 धावा करुन परतला. कोहलीला ही कमबॅकच्या सामन्यात नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. 

IND vs ENG 1st Test: इंग्लंडने पहिल्या डावात 578 एवढ्या डोंगराएवढ्या धावा केल्या असताना चेन्नईच्या मैदानात भारतीय फलंदाजांची अवस्था केविलवाणी झाली. पाहुण्यांच्या फलंदाजांना जे जमलं ते करुन दाखवायला भारतीय फलंदाज अपयशी ठरताना दिसले. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि फिरकीपटू डॉम बेस यांच्या ताळमेळाच्या जोरावर  इंग्लंडने भारतीय संघाच्या आघाडीला सुरुंग लावला. 

INDvsENG : पंत-पुजाराची शतकी भागीदारी थोडासा दिलासा देणारी

हिटमॅन रोहित अवघ्या  6 धावा करुन परतला. कोहलीला ही कमबॅकच्या सामन्यात नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. रहाणे अवघ्या 1 धावांवर बाद झाला. पहिल्या डावात द्विशतकी खळीनं संघाचा डावाला मजबूती देणाऱ्या ज्यो रुटन नेतृत्वासह लक्षवेधी फिल्डिंगन सर्वांच लक्ष्य वेधलं. डॉम बेसच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेचा त्याने एक उत्तम झेल टिपला.  इंग्लंडच्या फिरकीपटून कोहली, रहाणे आणि पुजारा या तगड्या फलंदाजांना माघारी धाडले.

रोहित शर्मा को ऑर्चरच्या हातात सोपा झेल देऊन बाद झाला. शुभमन गिलचा झेल जेम्स अँड्रसनने पकडला. विराट कोहलीही पोपच्या हाती झेलबाद देऊन फसला. अजिंक्य रहाणेचा झेल सर्वात बेस्ट होता. क्रिकेटच्या मैदानातील सर्वोत्तम झेलपैकी एक असाच झेल टिपत रुटने क्षेत्ररक्षणाचा अफलातून नजराणा दाखवून दिला. 


​ ​

संबंधित बातम्या