INDvsENG गब्बर नवव्यांदा झाला नर्व्हस नाइंटीचा शिकार

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 23 March 2021

क्रिकेटच्या मैदानात सर्वाधिक वेळा नर्व्हस नाइंटीची नामुष्की ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर ओढावली आहे.

India vs England, 1st ODI : टी-20 मालिकेत सूर हरपलेल्या अनुभवी गब्बरने वनडेत जबरदस्त कमबॅक केले. रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करणाऱ्या धनववने कोहलीसोबत शतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. तो आपल्या खात्यात आणखी एका शतकाची भर घालेल असे वाटत असताना 98 धावांवर बेन स्टोक्सने त्याची शिकार केली. वनडेत 140 सामन्यातील 137 डावात फलंदाजी करताना धवन सहाव्यांदा नव्वदीच्या घरात अडखळला आहे. तीन वेळा तोन कसोटीत नर्व्हस नाइंटीचा शिकार झाला आहे.

IND vs ENG: भावाने भावाला दिली वनडे कॅप; कृष्णालाही 'प्रसिद्धी'

क्रिकेटच्या मैदानात सर्वाधिक वेळा नर्व्हस नाइंटीची नामुष्की ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर ओढावली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तब्बल 27 वेळा नव्वदीच्या घरात बाद झाला आहे. त्याच्यापाठोपाठ द्रविडचा नंबर लागतो. राहुल द्रविड 12 वेळा नव्वदीच्या घरात बाद झाला. सेहवाग 10 वेळा नव्वदीच्या घरात येऊन अडखळला आहे. शिखर धवनची गांगुलीच्या नकोशा विक्रमासोबत बरोबरी झाली. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली देखील आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 9 वेळा नर्व्हस नाइंटीचा शिकार झाला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या