Ind vs Eng: दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा नवा प्लॅन; छाप सोडणाऱ्या गड्यांना बसवलं बाकावर

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन
Friday, 12 February 2021

अँड्रसनऐवजी इंग्लंडच्या संघाने  स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) ला संघात घेतले आहे. तर बेसच्या जागी अष्टपैलून  मोइन अली (Moeen Ali) ला संधी देण्यात आली आहे.

इंग्लंडच्या क्रिकेट संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी चेन्नईच्या मैदानात उतरण्यापूर्वीच शुक्रवारी 12 सदस्यीय संघाची घोषणा केली. पहिल्या कसोटी सामन्यात विशेष छाप सोडणाऱ्या अनुभवी गोलंदाजासह लक्षवेधी कामगिरी करणाऱ्यां फिरकीपटूला संघ व्यवस्थापनाने बाहेर बसवले आहे. जेम्स अँड्रसन (James Anderson) आणि फिरकीपटू डॉमिनिक बेस (Dominic Bess) दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार नाहीत.  

अँड्रसनऐवजी इंग्लंडच्या संघाने  स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) ला संघात घेतले आहे. तर बेसच्या जागी अष्टपैलून  मोइन अली (Moeen Ali) ला संधी देण्यात आली आहे. अँड्रसन आणि बेस यांच्याशिवाय विकेटकिपर फलंदाज जॉस बटलरलाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. 13 फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानात दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. 

जाफरसंदर्भातील धार्मिक वादाच्या प्रश्नावर अजिंक्यनं घेतला सावध पवित्रा

दुसऱ्या कसोटी सामन्यात जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) संघात दिसणार आहे. तो यष्टीमागच्या जबाबदारीसह फलंदाजीत संघाला किती फायदेशीर ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर संघात नसणार हे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. त्याच्या जागी अष्टपैलू क्रिस वोक्सला (Chris Woakes) संघात स्थान देण्यात आले आहे.   

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ

 ज्यो रूट (कर्णधार), डॉम सिब्ली, ज्यो बर्न्स, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, ओली पोप, जॉनी बेयरस्ट्रो (विकेटकिपर), मोइन अली, जॅक लीच, क्रिस वोक्स, ओली स्टोन, स्टुअर्ट ब्रॉड.


​ ​

संबंधित बातम्या