ICC WTC Final : क्रिकेटच्या पंढरीत भारत-न्यूझीलंड यांच्यात रंगणार फायनल

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 6 March 2021

इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना  पहिल्या डावात 205 धावा केल्या होत्या. भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात देखील खराब झाली. दुसऱ्या दिवसाचे दोन्ही सत्र इंग्लंडने आपल्या नावे केले.

भारतीय संघाने चौथा आणि अखेरचा कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशीच पाहुण्या इंग्लंडचा खेळ खल्लास केला. अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात  25 धावा आणि एक डाव राखून विजय नोंदवत टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. आयसीसीच्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आता लॉर्ड्सच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे. 18 जून रोजी ्दोन्ही संघ क्रिकेटच्या पंढरीत फायनल खेळतील.

अहमदाबादमधील तिसरा कसोटी सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने सामना जिंकावा, अशी ऑस्ट्रेलियाला आस होती. जर इंग्लंडने सामना जिंकला असता तर ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये प्रवेश मिळाला असता. पण आता त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत.

INDvsENG : आपल्याच 3 गड्यांनी वॉशिंग्टनला नाइंटीमध्ये नर्व्हस केलं

इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना  पहिल्या डावात 205 धावा केल्या होत्या. भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात देखील खराब झाली. दुसऱ्या दिवसाचे दोन्ही सत्र इंग्लंडने आपल्या नावे केले. पण रिषभ पंतने दुसऱ्या दिवशी अखेरच्या षटकात आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. पंतने वॉशिंग्टनसोबत शतकी भागीदारी करुन टीम इंडियाच्या डावाला आकारच नाही तर जिंकण्याची दिशेने पुढे नेले.

"हमारे इश्क से देश को प्यार हुआ" : गावसकर
 

वॉशिंग्टनने तिसऱ्या दिवशी अक्षर पटेलसोबत 165 धावांची भागीदारी रचत पहिल्या डावात भारतीय धावफलकावर 365 धावा लावल्या. 160 धावांच्या आघाडीमुळे भारतीय संघ मजबूत दिसत होता. अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकीसमोर इंग्लंडचा स मजल मारली होती.  6 बाद 146 अशा संकटातून पंत-वॉशिंग्टन जोडीने भारताचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसाअखेर भारताने पंतची विकेट गमावून 7 बाद 294 धावा केल्या होत्या.  

वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलने तिसऱ्या दिवशी 7 बाद 294 धावांवरुन भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. वॉशिंग्टन सुंदर 96 धावांवर खेळत असताना अक्षर पटेलच्या रुपात टीम इंडियाला आठवा धक्का बसला. अक्षर पटेल 43 धावांवर रन आउट झाला. त्यानंतर बेन स्टोक्सने ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजला एकाच षटकात शून्यावर माघारी धाडत भारतीय संघाचा डाव 365 धावांत आटोपला.  


​ ​

संबंधित बातम्या