INDvsENG : ...तरीही टीम इंडियालाच मिळेल लॉर्डसवर खेळण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

आफ्रिकेची ही तक्रार आयसीसीने मान्य केली आणि त्यांचे गुण कमी केले तर इंग्लंड जिंकूनही त्यांना अंतिम फेरी गाठता येणार नाही, असे वृत्त सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिले आहे.

लंडन : भारत-इंग्लंड सामन्याच्या निकालावर कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील दुसरा संघ ठरणार आहे. इंग्लंडने विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियाला संधी मिळणार असली तरी दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे या सामन्यात भारत पराभूत झाला तरी संधी कायम रहाणार आहे. ऑस्ट्रेलियाने कोरोनाचे कारण देत गेल्या महिन्यातील दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला. त्यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

INDvsENG : आम्ही तीन दिवसांत हरलो तेव्हा कोणी खेळपट्टी बघायला गेले नव्हते : विराट कोहली

परिणामी, ऑस्ट्रेलियाचे कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेतील गुण कमी करावेत, अशी अधिकृत तक्रार दक्षिण आफ्रिकेने आयसीसीकडे केली आहे. आफ्रिकेची ही तक्रार आयसीसीने मान्य केली आणि त्यांचे गुण कमी केले तर इंग्लंड जिंकूनही त्यांना अंतिम फेरी गाठता येणार नाही, असे वृत्त सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिले आहे. हे प्रकरण परस्पर चर्चा करून मिटवावे, असे सांगत आयसीसीने ऑस्ट्रेलियाला या आठवड्यापर्यंत वेळ दिला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळ यांच्यातील चर्चेतून मार्ग निघाला नाही, तर ही तक्रार आयसीसीच्या वाद निवारण समितीकडे वर्ग केली जाईल. तेथे स्वतंत्र समिती स्थापन करून ती मालिका ऑस्ट्रेलियाने नियमाचा आधार घेऊन रद्द केली का, याची चर्चा केली जाईल.
 


​ ​

संबंधित बातम्या