ICC World Test Championship Race : ऑस्ट्रेलियाचे सहायक प्रशिक्षक आशावादी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर म्हणतो, इंग्लंड या सामन्यात भारताला पराभूत करेल अशी अपेक्षा आहे, परंतु मी कदापि इंग्लंडला पाठिंबा देणार नाही.

मेलबर्न :  भारत-इंग्लंड मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यावर या उभय देशांएवढेच ऑस्ट्रेलियाचे लक्ष अधिक आहे. इंग्लंडचा संघ भारताला पराभूत करेल आणि कसोटी अजिंक्‍यपद अंतिम सामन्यात खेळण्याचा आमचा मार्ग मोकळा करेल, असे मत ऑस्ट्रेलियाचे सहायक प्रशिक्षक अँड्य्रू मॅकडोनल्ड यांनी व्यक्त केले.  इंग्लंडने विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे एरवी ॲशेस मालिकेत कट्टर प्रतिस्पर्धी असलेले इंग्लंड आता ऑस्ट्रेलियासाठी अधिक जवळचे झाले आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर म्हणतो, इंग्लंड या सामन्यात भारताला पराभूत करेल अशी अपेक्षा आहे, परंतु मी कदापि इंग्लंडला पाठिंबा देणार नाही. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून म्हणायचे तर ही मालिका बरोबरीत सुटणे आमच्यासाठी फलदायी आहे. तसे घडले तर आम्हाला आनंदच होईल.  

INDvsENG : ती खेळपट्टीवरुन 'रडारड' नव्हती का? वॉनचा विराटवर प्रश्नांचा मारा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील पराभवामुळे अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वीत इंग्लंडचा संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अखेरचा सामना जिंकला तरी मालिका बरोबरीत राखण्याशिवाय इंग्लंडला दुसरा कोणताही लाभ होणार नाही. याउलट इंग्लंडचा विजय ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. इंग्लंडचा विजयामुळे त्यांच्या आशा पल्लवित होऊ शकतात. 

INDvsENG : आम्ही तीन दिवसांत हरलो तेव्हा कोणी खेळपट्टी बघायला गेले नव्हते : विराट कोहली

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लढत क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानात रंगणार आहे. न्यूझीलंडचा संघ फायनलमध्ये पहिल्यांदा पोहचला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील निकालानंतर दुसरा फायनलिस्ट कोण हे स्पष्ट होणार आहे.     
 


​ ​

संबंधित बातम्या