IND vs ENG: द्रविडचा ईमेल शेअर करुन पीटरसन आपल्या गड्यांना देतोय फिरकीला खेळण्याचा सल्ला

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 24 January 2021

इंग्लंडच्या या दोन्ही सलामीवीरांना भारता विरुद्धच्या कसोटी सामन्यातही संघात स्थान देण्यात आले आहे. या दोघांनी द्रविडने फिरकला खेळण्याचा दिलेला सल्ला अंमलात आणण्याची गरज आहे, असे म्हणत पीटरसनने आपल्याच गड्यांची फिरकी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियात दौरा आटोपल्यानंतर भारतीय संघ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात धूळ चारल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास निश्चितच उंचावलेला असेल. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजायनंतर भारतीय संघाला सावधानतेचा इशारा देणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटर आपल्या संघातील गड्यांना फिरकीला कसे खेळायचे हा सल्ला देत आहे. विशेष म्हणजे यासाठी त्याने द्रविडच्या ईमेलचा वापर केला आहे. 

केविन पीटरसनने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ईमेलची कॉपी शेअर केली आहे. या ईमेलमध्ये द्रविडने पीटरसनला फिरकीला कसे खेळायचे याचा सल्ला दिला आहे. हाच सल्ला तो भारताच्या दौऱ्यावर जाणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांना देतोय.  2017 मध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भरवशाचा फलंदाज राहुल द्रविड याने पीटरसनला एक ईमेल पाठवला होता. या ईमेलची कॉपी त्याने ट्विटरवरुन शेअर केली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने हा ईमेल इंग्लंच्या सलामीवीरांपर्यंत पोहचवावा, असा उल्लेख पीटरसनने ट्विटमध्ये केलाय. सध्याच्या घडीला इंग्लंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात  डॉम सिब्ले आणि जॅक क्राउली या दोन्ही सलामीवीरांची श्रीलंकेचा डावखुरा फिरकीपटू लसिथ एम्बुलदेनियाच्या गोलंदाजीवर बाद झाले. पहिल्या कसोटी सामन्यातही इंग्लंडच्या सलामीवीरांना याच फिरकीपटूने जाळ्यात अडकवले होते.  

पडद्यामागच्या हिरोनंतर जिव्हाळ्याचा विषय झालेल्या अजिंक्यचा ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
 

इंग्लंडच्या या दोन्ही सलामीवीरांना भारता विरुद्धच्या कसोटी सामन्यातही संघात स्थान देण्यात आले आहे. या दोघांनी द्रविडने फिरकला खेळण्याचा दिलेला सल्ला अंमलात आणण्याची गरज आहे, असे म्हणत पीटरसनने आपल्याच गड्यांची फिरकी घेतली आहे. दोन्ही सलामीवीरांनी जर मला कॉल केला तर मी त्यांच्यासोबत द्रविडने दिलेला सल्ला शेअर करु, असेही पीटरसनने म्हटलंय.  क्राउले आणि सिब्ले यांनी द्रविडने फिरकीविरुद्ध खेळण्यासाठी मला दिलेल्या टिप्स वाचायला हव्यात. यामुळे माझ्या खेळात सुधारणा झाली, असेही पीटरसने कबुल केले आहे. 

यापूर्वी भारतीय संघाला केले होतं सावध!

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर केविन पीटरसनने एक ट्विट केले होते. तुम्ही ज्या परिस्थितीत खेळला आणि जिंकला ते कौतुकास्पद आहे. तुम्ही विजयाचे मानकरी आहात. पण आम्ही येतोय तयार रहा! असे सांगत ऑस्ट्रेलियापेक्षाही आम्ही भारी आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न केला होता.  
 


​ ​

संबंधित बातम्या