INDvsENG Test: बीसीसीआयचा सेफ गेम; स्टेडियममध्ये प्रेक्षकांना नो एन्ट्री

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 23 January 2021

दोन्ही संघ 27 नोव्हेंबरपर्यंत चेन्नईमध्ये पोहचतील. बायो-बबलमध्ये जाण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात येईल.

भारत आणि इंग्लंड (India vs England 2021) यांच्यात नियोजित आगामी कसोटी मालिकेतील दोन सामने प्रक्षकांशिवाय खळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कसोटी सामन्याचे आयोजन करणाऱ्या टीएनसीएच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली.  तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए) चे सचिव आर एस रामास्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या दोन कसोटी सामन्यात खबरदारी म्हणून कोणत्याही प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. भारतीय क्रिकेट मंडळाने  (बीसीसीआय) ने प्रेक्षकांशिवाय सामना खेळवण्यात येणार असल्याचे सूचना केली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, आर एस रामास्वामी म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिले दोन कसोटी सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. बीसीसीआयच्या निवेदनानुसार, कोरोना संकटाच्या काळात खेळाडूंना कोणत्याही जोखीमेचा सामना करावा लागू नये, यासाठी सुरक्षिततेची खबरदारी म्हणून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दुसरा कसोटी सामना 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान नियोजित आहे. दोन्ही सामने  एम ए चिदम्बरम स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येतील.

लॉकडाऊमध्येचं लिहिली ऐतिहासिक विजयाची स्क्रिप्ट; न्यूझीलंडचा अभ्यास करून दिली कांगारुंची परीक्षा

दोन्ही संघ 27 नोव्हेंबरपर्यंत चेन्नईमध्ये पोहचतील. बायो-बबलमध्ये जाण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात येईल.  केंद्र सरकारने आउट डोअर स्टेडियममध्ये योग्य त्या खबरदारीसह 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. पण पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या सुरुवातीला  बीसीसीआयने सेफ गेम खेळणेच पसंत केल्याचे दिसते. उर्वरित दोन कसोटी सामने अहमदाबादच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश मिळणार का? याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. 
 


​ ​

संबंधित बातम्या