INDvsENG : खेळपट्टीवरुन इंग्लंडचं 'नो_रडगाणं'; टीम इंडियाचं टेन्शनच मिटलं

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 27 February 2021

खेळपट्टीचा वाद आयसीसीपर्यंत गेला आणि त्यांनी खेळपट्टीचा दर्जा खराब होता, असा शेरा आयसीसीने मारला तर भारतीय संघाच्या अडचणी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांनी यावर अखेर पडदा टाकला आहे.   

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगलेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील सामना अवघ्या दोन दिवसांत निकाली लागला. पाच दिवसांचा खेळ 48 तासांच्या आत आटोपल्यानंतर खेळपट्टीवरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. खेळपट्टीचा वाद आयसीसीपर्यंत गेला आणि त्यांनी खेळपट्टीचा दर्जा खराब होता, असा शेरा आयसीसीने मारला तर भारतीय संघाच्या अडचणी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांनी यावर अखेर पडदा टाकला आहे.   

इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्वरवुड यांनी मोटेराच्या खेळपट्टीसंदर्भात आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याच्या वृत्त फेटाळून लावले आहे. खेळपट्टीसंदर्भात ते म्हणाले की, खेळपट्टी आणखी काही वेळ चांगली राहिल, असा अंदाज होता, पण दोन दिवसांतच निकाल लागला, असे त्यांनी म्हटले आहे. अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 112 आणि 81 धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या माजी क्रिकेटर्संनी खेळपट्टीवर चांगलीच टीका केली होती. भारतीय संघाने 10  विकेट्सनी जिंकला होता. या विजयासह भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत  2-1 अशी आघाडी घेतली आहे.  सुनील गावसकर यांच्यासारख्या दिग्गजाने देखील फिरकीचे कौतुक करत फलंदाज अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.  

INDvsENG...तर पराभूत इंग्लंडच्या संघाला दोन गुण मिळतील; भारतावर टांगती तलवार

ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना इंग्लंडचे प्रशिक्षक म्हणाले की, ज्यो रुटने 8 धावा खर्च करुन निम्मा संघ गारद केला. आम्ही ज्या खेळपट्टीवर खेळलो त्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाजही खेळले. त्यांनी आमच्यापेक्षा सरस खेळ केला, असे सांगत त्यांनी खेळपट्टीसंदर्भात कोणतीही तक्रार नाही, असे म्हटले आहे. खेळपट्टी आणखी काही वेळ उत्तम राहिल असा अंदाज होता, पण कमी वेळेतच सामन्याचा निकाल लागला, असेही इंग्लिश प्रशिक्षकांनी सांगितले.  

INDvsENG : टीम इंडियाला मोठा धक्का; बुमराह संघाची साथ सोडून घरी परतला

खेळपट्टीसंदर्भात आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा विचार करत आहात का? असा प्रश्न त्यांनी पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, आम्ही काही गोष्टींवर चर्चा करत आहोत. वास्तवात पुढच्या सामन्यात दमदार कामगिरी करुन मालिका बरोबरीत राखण्यावर भर देत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.  
आम्ही जवागल श्रीनाथ (मॅच रेफ्री) शी चर्चा केली आहे. पण खेळपट्टीच्या संदर्भात त्यांच्यासंदर्भात काहीही बोलणे झाले नाही. जो रुट आणि मी अशा खेळपट्टीवर चांगला खेळ कसा करता येईल, यावर चर्चा करेन, असेही त्यांनी सांगितले.

एकूणच खेळपट्टीसंदर्भात आयसीसीचा दरवाजा ठोठावणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे भारतीय संघाचे टेन्श्न कमी झाली आहे. जर त्यांनी आयसीसीकडे तक्रार केली असती आणि खेळपट्टी खराब असल्याचा शिक्का बसला असता तर तिसऱ्या कसोटी सामन्याचे गुण इंग्लंडला मिळाले असते. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टीम इंडियाचे टेन्शन आणखी वाढण्याचा प्रकार घडला असता. मात्र इंग्लंडचा संघ ही पावले उचलणार नाही, असेच दिसते.  


​ ​

संबंधित बातम्या