INDvsENG : कोरोनामुळे 100 व्या वर्षी निधन झालेल्या दिग्गजाला इंग्लिश खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 5 February 2021

. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर इंग्लंड क्रिकेटमधून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटने एका व्हिडिओच्या माध्यमातून शोक व्यक्त केला होता.  

England Cricketers Honour Of  Captain Sir Tom Moore :  भारत आणि इंग्लंड यांच्यातील 4 सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचे खेळाडू दंडाला काळ्या फिती बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. कोरोनामुळे 100 व्या वर्षी निधन झालेल्या इंग्लंडच्या  सर टॉम मुर यांना श्रद्धांजली देण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी दंडाला काळी फित बांधली होती.  

इंग्लंड क्रिकेटचे चाहते असणाऱ्या कॅप्टन मूर यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात काही काळ सेवा दिली होती. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना बेडफोर्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबियांनी त्यांच्या निधनाची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. निधनानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते.

पंतने गडबडीत कॅच सोडला; पण यष्टीमागच्या बडबडीत कमी पडला नाही; व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रीय आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी त्यांनी अनोखा संकल्प केला होता. आपल्या शंभराव्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी 320 पौंड इतकी रक्कमही जमा केली होती. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर इंग्लंड क्रिकेटमधून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटने एका व्हिडिओच्या माध्यमातून शोक व्यक्त केला होता.  

पहिल्या कसोटी सामन्यात 2 बाद 63 अशी बिकट अवस्था असताना कर्णधार जो रुटने सिब्लेच्या साथीनं संघाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. सलामीवीर सिब्लेही शतकाला गवसणी घालेल असे चित्र दिसत असताना बुमराहने त्याची तपस्या भंग केली. पहिल्या दिवसाच्या अखेरच्या षटकात तो 87 धावांवर बाद झाला. 


​ ​

संबंधित बातम्या