IND vs ENG: ज्यो-विराट सीनने धोनीच्या आठवणीला उजाळा (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 6 February 2021

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे सामन्यात धोनीने प्रतिस्पर्धी संघातील फाफ ड्युप्लेसीला अशीच मदत केली होती. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या मैदानात रंगला आहे. पहिल्या दिवशी शतकी खेळी करणाऱ्या ज्यो रुटने दुसऱ्या दिवशी दीड शतक पूर्ण केले असून तो अजूनही मैदानात आहे. पहिल्या दिवशी इंग्लंड संघाचा कर्णधार आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात एक जबरदस्त सीन पाहायला मिळाला. मोठी खेळी करुन संघाच्या डावाला आकार देणाऱ्या ज्यो रुट वेदनेनं तळमळताना दिसला.

पायाचे स्नायू दुखावल्यानंतर विराट कोहलीने खिलाडूवृत्ती दाखवत त्याला मदत केली.  सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगत असताना बीसीसीआयने एक खास व्हिडिओ शेअर केलाय. यात त्यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यातील खिलाडीवृत्तीची झलक सेम टू सेम असल्याचे दाखवण्यात आले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे सामन्यात धोनीने प्रतिस्पर्धी संघातील फाफ ड्युप्लेसीला अशीच मदत केली होती. 
 


​ ​

संबंधित बातम्या