ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड टी 20 भारत-इंग्लंड कसोटीपेक्षा ठरली सरस

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 February 2021

भारत आणि इंग्लंड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 17 फलंदाज बाद झाले, पण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटीत 13 फेब्रुवारी 1932 या म्हणजे दुसऱ्या दिवशी 20 फलंदाज बाद झाले होते. त्या कसोटीत दक्षिण आफ्रिका 36 आणि 45 धावा करीत असताना ऑस्ट्रेलियाने 153 धावा केल्या होत्या. 
 
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या ट्‌वेंटी 20 लढतीत एकंदर 434 (215 व 219) धावा झाल्या. दुसरीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत चार डावांत मिळून 387 धावा (ता. क. भारतासमोर विजयासाठी 306 षटकांत 49 धावा करण्याचे आव्हान होते) 

चेंडूची करामत

 • डाव    षटके     चेंडू
 • इंग्लंड, पहिला डाव    48.4-    292
 • भारत, पहिला डाव    53.2-  320
 • इंग्लंड दुसरा डाव    30.4    184
 • भारत दुसरा डाव     7.4    46
 • एकूण    140.2     -842

INDvsENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'वोकल फॉर लोकल'चा सिक्सर!​

एका दिवशी 20 विकेटचा इतिहास
भारत आणि इंग्लंड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 17 फलंदाज बाद झाले, पण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटीत 13 फेब्रुवारी 1932 या म्हणजे दुसऱ्या दिवशी 20 फलंदाज बाद झाले होते. त्या कसोटीत दक्षिण आफ्रिका 36 आणि 45 धावा करीत असताना ऑस्ट्रेलियाने 153 धावा केल्या होत्या. 

दोन दिवसांतील निकाल-  दोन दिवसांत संपलेली ही बाविसावी कसोटी
 
भारताने यापूर्वी अफगाणिस्तानला 2018 च्या बंगळूर कसोटीत दोन दिवसांत हरवताना 1 डाव 262 धावांनी विजय मिळवला होता इंग्लंडने दोन दिवसांत कसोटी गमावण्याची ही चौथी वेळ. यापूर्वी 1882 मध्ये ओव्हल, 1888 च्या लॉर्डस्‌ 1921 च्या नॉटिंगहॅम कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार 

कमी चेंडूत संपलेल्या कसोटी
विजयी    प्रतिस्पर्धी    चेंडू    ठिकाण

 • ऑस्ट्रेलिया    पाकिस्तान    893    शारजा, 2002
 • द. आफ्रिका    झिम्बाब्वे    907    पोर्ट एलिझाबेथ 2017
 • द. आफ्रिका    झिम्बाब्वे    940    केपटाऊन 2005
   
​ ​

संबंधित बातम्या