INDvsENG : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी मुंबईकर चेन्नईत पोहचले

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 27 January 2021

चेन्नईमध्ये पोहचल्यानंतर भारत आणि इंग्लंड दोन्ही संघातील खेळाडूंना 6 दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. 

इंग्लंड विरुद्धच्या  4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. या दोन सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू बुधवारी चेन्नईत दाखल झाले आहेत. उप-कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जलदगती गोलदाज शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) हे तीन मुंबईकर चेन्नईत पोहचले आहेत.  

मुंबईहून या तिघांनी एकाच विमानातून चेन्नईला पोहचले. कर्णधार विराट कोहली आणि अन्य खेळाडू देखील बुधवारीच चेन्नईत दाखल होणार आहेत. याठिकाणी खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात ठेवण्यात येईल. इंग्लंडचे  बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि मोईन अली हे दिग्गज सर्वात प्रथम चेन्नईत पोहचले आहेत. श्रीलंका दौऱ्यात दमदार कामिगिरी करुन कर्णधार जो रुटसह अन्य खेळाडूही आजच चेन्नईत पोहचणार आहेत. 

चेन्नईमध्ये पोहचल्यानंतर भारत आणि इंग्लंड दोन्ही संघातील खेळाडूंना 6 दिवस क्वारंटाईन करण्यात येईल. यादरम्यान त्यांची  कोरोना चाचणी घेतली जाईल. ज्या खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह असतील त्यांना बायो-बबलमध्ये पाठवण्यात येईल. कोरोनाच्या संकटानंतर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्याने नव्याने सुरुवात होत आहे. खबरदारी म्हणून बीसीसीआयने चेन्नईतील दोन्ही कसोटी सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय घेतलाय.  


​ ​

संबंधित बातम्या