EngvsPak : तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंड भक्कम स्थानी 

टीम ई-सकाळ
Saturday, 22 August 2020

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना साऊथॅम्प्टन येथे खेळला जात आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना साऊथॅम्प्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आणि खेळाच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल शुक्रवारी खेळ संपेपर्यंत चार विकेट्सच्या मोबदल्यात 332 धावा केल्या होत्या. त्यानंतर आज सामन्याच्या दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा संघ फलंदाजी करीत असून, जॅक क्रॉलीने केलेल्या दुहेरी शतकाच्या बळावर 530 धावांचा डोंगर उभा केला आहे. 

धोनीच्या निवृत्तीनंतर न्यूज चॅनलने लावला भलत्याच 'युवराज सिंग'ला फोन; VIDEO VIRAL  

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या सामन्यात सुरवातीला फलंदाजीची निवड करणाऱ्या इंग्लंडला, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने पहिला धक्का दिला. शाहीन आफ्रिदीने इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सला 6 धावांवर झेलबाद केले. यानंतर दुसरा सलामीवीर डॉम सिब्लेला यासिर शहाने यष्टिचित करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. डॉम सिब्ले 22 धावांवर बाद झाला. तर कर्णधार जो रूट देखील मोठी खेळी करू शकला नाही. जो रूटला देखील 29 धावांवर नसीम शहाने मोहम्मद रिझवानकडे झेलबाद केले. व ओली पोप यासिर शाहच्या गोलंदाजीवर यष्टिचित झाला. मात्र यादरम्यान, जॅक क्रॉलीने इंग्लंडच्या फळीची एक बाजू पकडून धरत 267 धावा केल्या. तसेच यावेळेस जॅक क्रॉलीला जोस बटलरने चांगली साथ दिली. परंतु असद शफिकच्या गोलंदाजीवर जॅक क्रॉलीला मोहम्मद रिझवानने स्टंप आऊट केले. जॅक क्रॉली आणि बटलर यांनी मिळून 359 धावांची भागीदारी रचली. जॅक क्रॉलीनंतर जोस बटलर 151 आणि क्रिस वोक्स 29 हे इंग्लंडच्या फलंदाजीची धुरा ओढत असून, इंग्लंड भक्कम स्थितीत पोहचला आहे. आताच्या घडीला इंग्लंडने 5 गड्यांच्या मोबदल्यात 530 धावा फलकावर लावल्या आहेत. 

धोनीच्या फेअरवेल सामन्यासाठी बीसीसीआय तयार 

दरम्यान, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 5 ऑगस्ट रोजी मँचेस्टर येथे पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या संघाच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेत पहिला सामना जिंकला होता. पाकिस्तानला या कसोटीत मजबूत स्थितीतून देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर साऊथॅम्प्टनच्या एजस रोझ बाऊल येथील दुसरा कसोटी सामना पावसामुळे वाया गेला होता. त्यामुळे या मालिकेत पराभवापासून वाचण्यासाठी पाकिस्तानला शेवटचा आणि तिसरा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागणार आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1 - 0 ने आघाडी मिळवली आहे.                       


​ ​

संबंधित बातम्या