विंडीजविरुद्धच्या मालिकेपूर्वी इंग्लंडचा गडी म्हणाला, माझ्यातही कोरोनासारखी लक्षणं होती

टीम ई-सकाळ
Sunday, 28 June 2020

वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी 30 सदस्यीय संघात स्थान मिळालेला जॅक म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावेळी सामना करावा लागलेल्या आजारात कोरोनासारख्या लक्षणं जाणवली. आता मी पूर्णपणे सावरलो असून मैदानात उतरुन दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.

लंडन : कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत इंग्लंडच्या मैदानातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज-इंग्लंड यांच्यात 8 जूलैपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार असून या ऐतिहासिक मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागून असताना इंग्लंडच्या फिरकीपटूनं दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात कोरोनाची लक्षण जाणवल्याचे म्हटले आहे. इंग्लंड फिरकीपटू जॅक लीच म्हणाला की, दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान कोरोनाची लक्षण जाणवली. सध्याच्या घडीला फिट असून संघात परतण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघात त्याला स्थान मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

शोएबनं सानियाच्या डोळ्यादेखत केल माहिराशी फ्लर्ट; मग काय चर्चा तर होणारच

यावर्षीच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. यावेळी डावखुऱ्या फिरकीपटूला सेंच्युरियन कसोटीपूर्वी मायदेशी परतण्याची वेळ आली होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी 30 सदस्यीय संघात स्थान मिळालेला जॅक म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावेळी सामना करावा लागलेल्या आजारात कोरोनासारख्या लक्षणं जाणवली. आता मी पूर्णपणे सावरलो असून मैदानात उतरुन दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. क्रिकेटच्या मैदानात उतरत फिट राहण्यावर भर देईन, असेही तो म्हणाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यात जी लक्षणं आता असती तर खूप कठिण झाले असते. 

जिममध्ये जायचय? अगोदर हे वाचा 

लीचशिवाय डोम बेस, मोईन अली या अनुभवी फिरकीपटूंसह अमर विर्डी आणि मॅट पार्किंसन या नवोदित फिरकीपटूंना इंग्लंडच्या ताफ्यात संधी मिळाली आहे. योग्य मानसिकता ठेवून कोणतेही लक्ष्य सहज पार करता येते, असे सांगत लीचने संघात स्थान मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या हेटिंग्ले कसोटीत लीच 17 चेंडूचा सामना केला होता. बेन स्टोक्ससोबत त्याने केलेल्या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने हा सामना 1 गडी राखून जिंकला होता. मानसिकतेच्या जोरोवरच हे शक्य झाले, अशी आठवणही त्याने यावेळी सांगितली.  


​ ​

संबंधित बातम्या