ENGvsPAK Test : नो बॉलच्या नव्या तंत्राचा प्रयोग

सुशांत जाधव
Wednesday, 5 August 2020

नो बॉलच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापरामुळे मैदानातील पंचांना थेट नो बॉल घोषीत करता येणार नाही. फ्रंट फूट नो बॉल (Front Foot No ball) चा निर्णय हा  थर्ड अंपायर घेतील.  

कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत इंग्लंड-वेस्ट इंडीज यांच्यातील मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. या ऐतिहासिक मालिकेतील विजयानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यातील एका नियमामुळे या सामन्याचीही क्रिकेटच्या इतिहासात एक वेळी नोंद होणार आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात नो बॉलसंदर्भातील नव्या तंत्राचा वापर करण्यात येत आहे. आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांच्या संमतीने नो बॉलसंदर्भातील नवी प्रणाली लागू करण्यात आली. 

आयपीएलमुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील T-20 मालिका स्थगित

नो बॉलच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापरामुळे मैदानातील पंचांना थेट नो बॉल घोषीत करता येणार नाही. फ्रंट फूट नो बॉल (Front Foot No ball) चा निर्णय हा  थर्ड अंपायर घेतील.  इंग्लंड- पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात नो बॉलसंदर्भातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती आयसीसीने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात हा प्रयोग यशस्वी ठरला तर भविष्यात क्रिकेटच्या अन्य प्रकारातील सामन्यातही या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.  

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...  

काय आहे नो बॉलचं  नवं तंत्र 
सामन्यातील प्रत्येक चेंडूवर थर्ड अंपायरचे बारीक लक्ष असेल.  फ्रंट फूटचा नो बॉल असेल तर थर्ड अंपायर याची कल्पना मैदानातील अंपायर्सला देतील. याचा अर्थ थर्ड अंपायरच्या निर्णयाशिवाय पूर्वीप्रमाणे मैदानातील अंपायरला नो बॉल देता येणार नाही. 
 


​ ​

संबंधित बातम्या