ड्रेसिंग रुम सोडायचा विचार करून रडायला येते : ऍलिस्टर कूक

सुनंदन लेले
Wednesday, 5 September 2018

‘‘मला चाहत्यांच्या प्रेमाचे मोल आहे. मला भरवसा आहे की चाहत्यांच्या शुभेच्छांमुळे मी कठीण काळातून तरून गेलो. कधी दुखापतीतून सावरायला मला त्या शुभेच्छांची मदत झाली तर कधी बॅटींगची हरवलेली लय सापडायला आणि जोमाने कष्ट करून पुढे बघायला मला मदत झाली. चाहत्यांनी मला क्रिकेटर बनवले’’, चाहत्यांचे ऋण मान्य करताना कूक म्हणाला.  

लंडन : ‘‘खूप भारावून जायला होत आहे मला लोक माझ्याबद्दल चांगले बोलत असल्याचे ऐकून. माझ्यात तुफान गुणवत्ता नव्हती. मी प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो इतकेच. जेव्हा मी चौथ्या सामन्यानंतर माझा निर्णय सहकार्‍यांना कळवला तेव्हा सगळे भावुक झाले. मला वाटले होते मी भावनांवर नियंत्रण ठेवेन पण अपेक्षेपेक्षा मी जास्त रडलो. माझ्याकरता इंग्लंड ड्रेसिंग रूम दुसरे घर आहे. ती आता सोडायचा विचार करून मला रडायला येत होते’’, अशी भावना निवृत्ती जाहीर केलेला इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकने म्हटले आहे.

पाचव्या कसोटी सामन्याची तयारी जोमाने चालू केली असताना भारतीय संघाकडून रवी शास्त्री आणि इंग्लंड संघाकडून अ‍ॅलिस्टर कुक बोलायला आले. ओव्हलचा कसोटी सामना अ‍ॅलिस्टर कुकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असल्याने इंग्लंडमधे कुकच्या कारकिर्दीवर स्तुतीसुमने उधळली जात आहेत.

‘‘मला चाहत्यांच्या प्रेमाचे मोल आहे. मला भरवसा आहे की चाहत्यांच्या शुभेच्छांमुळे मी कठीण काळातून तरून गेलो. कधी दुखापतीतून सावरायला मला त्या शुभेच्छांची मदत झाली तर कधी बॅटींगची हरवलेली लय सापडायला आणि जोमाने कष्ट करून पुढे बघायला मला मदत झाली. चाहत्यांनी मला क्रिकेटर बनवले’’, चाहत्यांचे ऋण मान्य करताना कूक म्हणाला.  

2015सालच्या अ‍ॅशेस मालिकेतील विजय आणि भारताला भारतात येऊन कसोटी मालिकेत हरवण्याचा पराक्रम सर्वांत भावला असल्याचे कुकने सांगितले.

​ ​

संबंधित बातम्या