ENGvsNZ : ऍशेसचा धसका; इंग्लंडने संघात केले 'हे' धक्कादायक बदल

वृत्तसंस्था
Tuesday, 24 September 2019

ऍशेस मालिकेत झालेल्या चुका न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत टाळण्यासाठी इंग्लंडच्या संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. ऍशेसमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे दोन्ही सलामीवीरांना कसोटी संघातून हाकलण्यात आले आहे. त्यांच्याजागी इंग्लंडने चार खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी कसोटी आणि ट्वेंटी20 संघ जाहीर केला. 

लंडन : ऍशेस मालिकेत झालेल्या चुका न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत टाळण्यासाठी इंग्लंडच्या संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. ऍशेसमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे दोन्ही सलामीवीरांना कसोटी संघातून हाकलण्यात आले आहे. त्यांच्याजागी इंग्लंडने चार खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी कसोटी आणि ट्वेंटी20 संघ जाहीर केला. 

Vijay Hazare Trophy : महाराष्ट्राचा संघ जाहीर; केदार जाधवकडे कर्णधारपद

सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टॉ यांना संघातून हाकलून लावण्यात आले आहे. इंग्लंडने संघात चार नवोदित खेळाडूंना स्थान दिले आहे. इंग्लंडने डॉम सिबली, झॅक क्रॉवले, साकिब मेहमूद, मॅट पार्किनसन यांना कसोटी संघात स्थान दिले आहे. तसेच मेहमूद आणि पार्किनसन यांच्यासह टॉन बॅटन आणि पॅट ब्राऊन यांनाही ट्वेंटी20 संघात पदर्पणाची संधी देण्यात आली आहे. 

सिबलीने यंदाच्या कौंटी क्रिकेटमध्ये 13 सामन्यांमध्ये सर्वाधिक 1324 धावा केल्या आहेत. त्याने यंदाच्या मोसनात दोन द्विशतकांसह पाच शतकं झळकाविली आहेत. रॉयला संघातून वगळल्याने त्याच्याजागी सिबली सलामीला खेळण्याची शक्यता आहे. 

INDvsSA : हेंड्रिक्‍सच्या अंगावर धावल्याने आयसीसीची विराटला तंबी; नावावर एक दोषांकही

ट्वेंटी20 संघ : इयॉन मार्गन, जॉनी बेअरस्टॉ, टॉम बॅटन, सॅम बिलिंग्स, पॅट ब्राऊन, सॅम करन, टॉम करन, ज्यो डेन्ली, लेविस ग्रेरोरी, साकिब मेहमूद, आदिल रशीद, जेम्स व्हिन्स, मॅट पार्किनसन

कसोटी संघ : ज्यो रुट, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॉवले, सॅम करन, ज्यो डेन्ली, जॅक लिच, साकिब मेहमूद, मॅथ्यू पार्किनसन, ऑली पोप, डॉम सिबली, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स


​ ​

संबंधित बातम्या