इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

टीम ई-सकाळ
Sunday, 2 August 2020

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसनने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडची चांगलीच प्रशंसा केली आहे.

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसनने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडची चांगलीच प्रशंसा केली आहे. राहुल द्रविडने केलेल्या एका मेल मुळे फिरकी गोलंदाजीविरूद्ध खेळण्यास खूप मदत झाल्याचे इंग्लंडचा फलंदाज केविन पीटरसनने म्हटले आहे. याशिवाय इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सामन्यांमध्ये द्रविड आणि वीरेंद्र सेहवागसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळल्यामुळे आपल्या खेळीत सुधारणा झाल्याचे केविन पीटरसनने सांगितले आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनने डेक्कन चार्जर्स, दिल्ली कॅपिटल, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद अशा संघांकडून आयपीएलच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यानंतर गेल्या काही वर्षातील एकदिवसीय फलंदाजीतील बदलावर झालेल्या चर्चेमध्ये संवाद साधताना, केविन पीटरसनने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि 'द वॉल' राहुल द्रविडचे कौतुक केले आहे. राहुल द्रविडच्या एका मेल मुळे फिरकीविरूद्ध खेळण्यास खूप मदत झाल्याचे केविन पीटरसनने सांगितले. "द्रविडने मला सर्वात सुंदर ईमेल लिहिला होता, या मेल मध्ये मला फिरकी खेळण्याची कला द्रविडने सांगितली होती. आणि तेव्हापासून माझ्यासमोर एक नवीन जग निर्माण झाले," असे केविन पीटरसनने यावेळी सांगितले. फिरकी गोलंदाजाने चेंडू टाकताच त्याचा अंदाज घेणे सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट आहे. व त्यानंतर फिरकीची वाट पाहून मग निर्णय घेणे गरजेचे असल्याचे राहुल द्रविडने या मेल मध्ये लिहिल्याचे केविन पीटरसनने सांगितले. तसेच राहुल द्रविडने सांगितलेल्या या उपायामुळे फलंदाजी करताना 'स्विच हिट' शॉट खेळण्यास मोठी मदत झाली असल्याचे, केविन पीटरसनने नमूद केले. 

याशिवाय, आयपीएल सामन्यांमध्ये सहभागी झाल्यामुळे राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग यांच्यासारख्या अव्वल खेळाडूंसोबत एकत्र खेळता आल्याचे केविन पीटरसनने म्हटले आहे. व या खेळाडूंसोबत खेळल्यामुळे आपल्या फलंदाजीत देखील सुधारणा झाल्याचे केविन पीटरसन म्हणाला. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

दरम्यान, केविन पीटरसनने 2004 पासून ते 2014 पर्यंत इंग्लंडच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. या दरम्यान पीटरसनने 104 कसोटी सामन्यांमध्ये 47.28 च्या सरासरीने 8181 धावा केल्या आहेत. केविन पीटरसन हा मुख्यतः आक्रमक फलंदाज होता, विशेषत: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये. त्यामुळे त्याने 136 एकदिवसीय सामन्यात 40.73 च्या सरासरीने 4440 धावा केल्या आहेत.            


​ ​

संबंधित बातम्या