वर्णभेदाचा_खेळ : आता खपवून घेणार नाही! जोफ्रा आर्चर भडकला

सुशांत जाधव
Wednesday, 22 July 2020

इंग्लंड ताफ्यातील युवा गोलंदाज जोफ्रा आर्चरला वर्णद्वेषाचा सामना करावा लागण्याची ही पहिली वेळ नाही.

मँचेस्टर:  विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर कोविड-19 नियमाचे उल्लंघन केल्यामुळे दंडात्मक काराईसह जोफ्रा आर्चरला पुन्हा एकदा वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. क्वारंटाइनच्या कालावधीत त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्णद्वेशावरुन डिवचण्याचा प्रकार घडला. जैविक सुरक्षा नियमाचे उल्लंघन पहिल्या सामन्यानंतर जोफ्रा आपल्या मैत्रीणीला भेटण्यासाठी घरी गेला होता. त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्याला मुकावे लागलेच याशिवाय त्याला होम क्वांरटाइन होण्याची वेळ आली.  आर्चरने डेली मेलसाठी लिहिलेल्या स्तंभलेखात आपल्यावर वर्णभेदी टिपण्णी झाल्याचा उल्लेख केलाय. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियापासूनही दूर आहे. सध्याच्या घडीला आपण अस्थिर दुनियेत जगत आहोत. बऱ्याचदा चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. चांगली कामगिरी केल्यानंतर ते पुन्हा कौतुक करतात. मागील काही दिवसांत इन्टाग्रामच्या माध्यमातून मला शिवीगाळ झाली. वर्णावरुन पुन्हा डिवचण्यात आले, असे सांगत आता या गोष्टी सहन करणार नाही, असे सांगत त्याने संताप व्यक्त केला.  

#वर्णभेदाचा_खेळ : साहेबांच्या ताफ्यातील हा प्रतिभावंत खेळाडूही दुखावलाय

जेव्हा क्रिस्टल पॅलेसचा फुटबॉलर विलफ्रायड जाहाला एका  12 वर्षांच्या मुलाने ऑनलाइनच्या माध्यमातून वर्णद्वेषाची टिपण्णी केली. त्यावेळीपासून अशा गोष्टी खपवून घ्यायच्या नाहीत, अशी खुणगाठ मनाला बांधली आहे. त्यामुळेच वर्णद्वेषाचा सामना केल्याची माहिती ईसीबीला (इंग्लंड क्रिकेट बोर्ड) दिली. यासंबंधी ते योग्य ती चौकशी करतील, असा विश्वासही आर्चरने व्यक्त केला. विंडीज विरुद्धच्या सामन्यानंतर नियमाचे उल्लंघन केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरण्यासाठी तो सज्ज झाला आहे.  

वर्णभेदाच्या मुद्यावर केएल राहुलने शेअर केली भावनिक पोस्ट

इंग्लंड ताफ्यातील युवा गोलंदाज जोफ्रा आर्चरला वर्णद्वेषाचा सामना करावा लागण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी  न्यूझीलंड दौऱ्यावर त्याला वर्णभेदावरुन डिवचण्याचा प्रकार घडला होता. मागील वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात एका न्यूझीलंड चाहत्याने जोफ्राला डिवचले होते.  ड्रेसिंगरुममध्ये जात असताना संबंधित न्यूझीलंड संघाच्या चाहत्याने जोफ्राला त्याच्या रंगावरुन अपशब्द वापरले. याप्रकरणी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने संबंधित क्रिकेट चाहत्यावर कठोर कारवाई करत प्रकरणाकडे गंभिरतेने पाहिले होते. 


​ ​

संबंधित बातम्या