इंग्लंडचा माजी कर्णधार कॉलिंगवूड निवृत्त 

वृत्तसंस्था
Thursday, 13 September 2018

पूर्ण विचारांती आपण निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचे कॉलिंगवूडने म्हटले आहे. तो म्हणाला, ""ही वेळ एक दिवस येणारच होती, हे माहित होते. हा निर्णय घेणे खरंच खूप कठीण होते. मैदानात प्रत्येक वेळी इंग्लंड संघ आणि क्रिकेटसाठी शेवटपर्यंत लढलो, याचा अभिमान वाटतो. त्यामुळेच हा निर्णय निश्‍चितच भावनात्मक होता.''

लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू पॉल कॉलिंगवूड याने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. कारकिर्दीच्या 22 वर्षांनंतर कॉलिंगवूडने यंदाच्या मोसमाअखेर आपण व्यावसायिक क्रिकेटही खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. 

तीन वेळा ऍशेस जिंकण्याचा साक्षीदार असणारा कॉलिंगवूड इंग्लंडला विश्‍वविजेतेपद मिळवून देणारा एकमेव कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2010 मध्ये टी-20 विश्‍वविजेतेपद मिळविले होते. क्रिकेटचे जन असणाऱ्या इंग्लंडच्या पदरात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील हे एकमेव विश्‍वविजेतेपद आहे. 

पूर्ण विचारांती आपण निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचे कॉलिंगवूडने म्हटले आहे. तो म्हणाला, ""ही वेळ एक दिवस येणारच होती, हे माहित होते. हा निर्णय घेणे खरंच खूप कठीण होते. मैदानात प्रत्येक वेळी इंग्लंड संघ आणि क्रिकेटसाठी शेवटपर्यंत लढलो, याचा अभिमान वाटतो. त्यामुळेच हा निर्णय निश्‍चितच भावनात्मक होता.'' 

कॉलिंगवूड कारकीर्द 
68 कसोटी 
4259 धावा 
10 शतके 
20 अर्धशतके 
17 विकेट्‌स 

197 वन-डे 
5092 धावा 
5 शतके 
26 अर्धशतके 
111 विकेट्‌स 

36 टी-20 
583 धावा 
3 अर्धशतके 
16 विकेट्‌स 

संबंधित बातम्या