लायन बोलतो वाघासारखा, आतून घाबरतो शेळीसारखा: रूट

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

कांगारू उपांत्य फेरीत अद्याप हरलेले नाहीत. उभय संघांमध्ये मागील 12 पैकी 10 सामने मात्र त्यांनी गमावले आहेत. यासंदर्भात रूट म्हणाला की, आमच्या सध्याच्या संघातील खेळाडूंचा गेल्या चार वर्षांतील अनुभव फार सकारात्मक आहे. आमच्या खात्यात बरेच यश जमा आहे. आम्ही आता दीर्घकाळ कांगारूंविरुद्ध यशस्वी ठरलो आहोत. आम्ही त्यापासून प्रेरणा घेऊ. आम्हाला फार मोठी संधी आहे. या आठवड्याचा कालावधी खास आहे.' 

लंडन : "नेथन लायन जे काही म्हणतो तो त्याच्यावरीलच नव्हे; तर संघावरील दडपण कमी करण्याचा मार्ग असू शकतो. प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर मी याकडे फारसे लक्ष देत नाही,' अशा शब्दांत इंग्लंडचा फलंदाज ज्यो रूट याने प्रत्युत्तर दिले. कांगारूंविरुद्ध दोनहात करण्यास सज्ज असल्याचे त्याने सांगितले. 

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड लढत म्हटल्यावर झणझणीत चुरस झडते. त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी ती एक आव्हान ठरते. इंग्लंडचा फलंदाज ज्यो रूट याला मात्र आपण त्यास अपवाद असल्याचे वाटते. गुरुवारी हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येत आहेत. त्याचे काउंटडाउन सुरू झाले आहे. गटसाखळीत इंग्लंडला पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे इंग्लंडवर दडपण असेल. त्यातच ऑस्ट्रेलियाने शब्दयुद्ध छेडले आहे. "हा वर्ल्ड कप इंग्लंडला हरण्यासाठीच आहे,' असे विधान कांगारूंचा फिरकी गोलंदाज नेथन लायन याने केले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर रूटने सांगितले की, चुरशीच्या स्वरूपामुळे चित्त विचलित होणार नाही. सामन्यादरम्यान काही वेळा चुरशीला झणझणीत स्वरूप प्राप्त झाले आहे. खेळादरम्यान काही चकमकीसुद्धा झडल्या आहेत. एकंदरीत आम्ही मात्र आमच्या पद्धतीने परिस्थितीला सामोरे जाऊ. आम्हाला शक्‍य तेवढी सर्वोत्तम तयारी करायची आहे.' 

कांगारू उपांत्य फेरीत अद्याप हरलेले नाहीत. उभय संघांमध्ये मागील 12 पैकी 10 सामने मात्र त्यांनी गमावले आहेत. यासंदर्भात रूट म्हणाला की, आमच्या सध्याच्या संघातील खेळाडूंचा गेल्या चार वर्षांतील अनुभव फार सकारात्मक आहे. आमच्या खात्यात बरेच यश जमा आहे. आम्ही आता दीर्घकाळ कांगारूंविरुद्ध यशस्वी ठरलो आहोत. आम्ही त्यापासून प्रेरणा घेऊ. आम्हाला फार मोठी संधी आहे. या आठवड्याचा कालावधी खास आहे.' 

रूट हा नेहमीच कांगारूंचे "टार्गेट' राहिला आहे. 2013 मधील चॅंपियन्स ट्रॉफीदरम्यान बर्मिंगहॅममधील बारमध्ये त्याचा डेव्हिड वॉर्नरशी खटका उडाला होता. 

नेथन लायनकडे बऱ्याच वेळा बरेच काही बोलण्यासारखे असते. तुम्ही ते फार गांभीर्याने घ्यायचे नसते, फक्त ऐकायचे असते. 
- ज्यो रूट, इंग्लंडचा फलंदाज 

​ ​

संबंधित बातम्या