कोरोना नंतरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांसाठी इंग्लंडकडून संघाची घोषणा 

टीम ई-सकाळ
Tuesday, 18 August 2020

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील या कसोटी मालिकेनंतर तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्सच्या क्रिकेट मंडळाने आज संघाची घोषणा केली आहे. 

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या पाकिस्तान संघावर मात करत, तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1 - 0 ने आघाडी घेतली आहे. त्यानंतर साऊथॅम्प्टन येथील रोझ बाऊलच्या मैदानावर झालेला दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे या मालिकेत पराभवापासून वाचण्यासाठी पाकिस्तानला शेवटचा आणि तिसरा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागणार आहे. तर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील या कसोटी मालिकेनंतर तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्सच्या क्रिकेट मंडळाने आज संघाची घोषणा केली आहे. 

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड 

कोरोनाच्या काळानंतर मागील महिन्यातील जुलै मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरवात झाली होती. ज्यामध्ये इंग्लंड संघाने विंडीज संघावर मात करत मालिका काबीज केली होती. त्यानंतर या महिन्यातील  5 ऑगस्ट पासून इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. यातील ओल्ड ट्रॅफर्ड येथील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने तीन गडी राखत पाकिस्तान संघावर विजय मिळवला होता. तर रोझ बाऊल येथील दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल काल सोमवारी पावसामुळे अनिर्णित ठरला आहे. व या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक कसोटी सामना साऊथॅम्प्टनला 21 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. 

धोनीच्या जिवलग मित्रांबद्दल तुम्हाला माहिती आहे का ? वाचा सविस्तर 

या कसोटी मालिकेनंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोरोनाच्या संकटानंतर खेळवण्यात येणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामना असणार आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील ही तीन सामन्यांची मालिका देखील जैव-सुरक्षित वातावरणात, बंद दाराच्या मागे खेळली जाणार असून, यातील पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यांसाठी इंग्लंडच्या निवड समितीने आज संघाची घोषणा केली आहे. या संघात इयन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोनाथन बेयरस्टो, टॉम बॅंटन, सॅम बिलिंग्स, टॉम कुरन, जो डेन्ली, लुईस ग्रेगरी, ख्रिस जॉर्डन, साकीब महमूद, डेव्हिड मालन, आदिल रशीद, जेसन रॉय, डेव्हिड विले यांचा समावेश असणार आहे. तर, पॅट ब्राउन, लियाम लिव्हिंगस्टोन, रीस टोपली या राखीव खेळाडूंचा समावेश पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत असेल.          


​ ​

संबंधित बातम्या