पराभवामुळे इंग्लंड संघात 'या' खेळाडूचा समावेश

वृत्तसंस्था
Thursday, 23 August 2018

इंग्लंड संघ पुढीलप्रमाणे : ज्यो रुट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टॉ, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, ऍलिस्टर कुक, सॅम करन, किटॉन जेनिंग्ज, ओली पोप, आदिल रशीद, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स

लंडन : भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने चौदा सदस्यीय संघाची आज (गुरुवार) घोषणा केली. या सामन्यासाठी जेम्स विन्सचा इंग्लंडने संघात समावेश केला आहे.

भारताविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळविला होता. तर, तिसरा कसोटी सामना त्यांना गमवावा लागला होता. त्यामुळे इंग्लंडने चौथ्या कसोटीसाठी संघात एक बदल केला आहे. या दोन्ही संघातील चौथा कसोटी सामना 30 ऑगस्टपासून रोस बोल येथे खेळविला जाणार आहे.

कौंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायरकडून खेळत असलेल्या 27 वर्षीय जेम्स विन्सने इंग्लंडसाठी अखेरचा कसोटी सामना न्यूझीलंडविरुद्ध एप्रिलमध्ये ख्राईस्टचर्च येथे खेळला होता. त्यानंतर तो संघाबाहेर होता. अखेर त्याला पुन्हा चौदा सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. विन्सने यंदाच्या मोसमात 56 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. 

इंग्लंड संघ पुढीलप्रमाणे : ज्यो रुट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टॉ, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, ऍलिस्टर कुक, सॅम करन, किटॉन जेनिंग्ज, ओली पोप, आदिल रशीद, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स

संबंधित बातम्या