ENG vs WI : ऐतिहासिक सामन्यात विंडीजचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर 

टीम ई-सकाळ  
Sunday, 12 July 2020

कसोटीच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात खेळताना इंग्लंडचा संघ 313 धावांवर सर्व बाद झाला असून, वेस्ट इंडीजला विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

कोरोना काळानंतर यजमान इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात साऊथॅम्प्टन मैदानावरील एजेस बाऊल येथे 8 जुलै पासून पहिल्या कसोटी सामन्यास सुरवात झाली. सामन्याच्या पहिल्याच दिवशीचा खेळ सुरु होण्यापूर्वी पावसाने काही काळ व्यत्यय आणला होता. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि खेळास सुरवात झाली. सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डर आणि शॅनन गॅब्रिएलने इंग्लंडला 204 धावांवर रोखले.

विराट कोहली असलेल्या वर्ल्ड टी -20 संघाचे नेतृत्व हिटमॅन रोहितकडे   

वेस्ट इंडिज संघाने फलंदाजी करताना यष्टीरक्षक शेन डोरिच (61) आणि रोस्टन चेस (47) यांच्या बळावर 114 धावांची आघाडी घेत 318 धावा केल्या. त्यानंतर खेळाच्या दुसऱ्या डावात इंग्लंडच्या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. रोरी बर्न्स आणि डोमिनिक सिब्लेनं पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. बर्न्स (42) आणि सिब्ले (50) धावा करुन माघारी फिरल्यानंतर  जो डेन्ली (29) धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या जॅक क्रॉली (76) आणि बेन स्टोक्स (46) यांनी इंग्लंड संघाचा डाव सावरला व चौथ्या विकेटसाठी दोघांनी 98 धावांची भागीदारी रचली. ही जोडी माघारी फिरल्यानंतर मोठ्या आशा असणारा बटलर अवघ्या 9 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 8 बाद 284 धावा केल्या होत्या. 

ला लिगा : रिअल माद्रिद-बार्सिलोनामध्ये रस्सीखेच कायम 

कसोटीच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात खेळताना इंग्लंडचा संघ 313 धावांवर सर्व बाद झाला असून, वेस्ट इंडीजला विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. विंडीजकडून दुसऱ्या डावात शॅनन गॅब्रिएल 5, रोस्टन चेज आणि अल्जारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 - 2 आणि जेसन होल्डरने 1 विकेट घेतल्या. यानंतर 200 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या विंडीजसंघाचा सलामीवीर क्रॅग ब्रेथवेट(4) आणि ब्रुक्सला शून्यावर जोफ्रा आर्चरने परत पाठवले. तर शाई होपला मार्क वुडने 9 धावांवर पायचीत केले. सध्याच्या स्थितीला विंडीजसंघाने तीन विकेटच्या बदल्यात 78 धावा केल्या असून रोस्टन चेस आणि ब्लॅकवुड मैदानात टिकून खेळत आहेत. रोस्टन चेस 28 आणि ब्लॅकवुड 26 धावांवर खेळत आहेत.

 


​ ​

संबंधित बातम्या