'पॉप'च्या खेळीनंतर सचिन आठवणीत रमला!

सुशांत जाधव
Saturday, 25 July 2020

दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर तो कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक सहज पूर्ण करेल असे वाटत होते. पण...

मुंबई : इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा आण अखेरचा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानात सुरु आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील पहिल्या दिवशीच्या खेळात इंग्लंडचा युवा फलंदाज ओली पोपच्या खेळीनं सर्वांनाच प्रभावित केलं. दिवसाअखेर तो नव्वदीच्या घरात पोहचला होता. या दरम्यान त्याने 11 चौकार लगावले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही त्याच्या या खेळीनं प्रभावित केलं आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सचिनने सामन्यादरम्यान ओली पोप फटका लगावत असलेला एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलाय. पोपला फटकेबाजी करताना पाहत असताना इंग्लंडचा माजी कर्णधार इयान बेल याची आठवण येते, अशा आशयाचे ट्विट करत सचिन तेंडुलकर आपल्या काळात रमल्याचे पाहायला मिळते आहे.  

ENGvsWI 3rd Test :पोप शतकाच्या उंबरठ्यावर; पहिल्या दिवसाअखेर यजमान मजबूत स्थितीत

तेंडुलकरने ट्विटरच्या माध्यमातून दोघांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसह त्याने लिहिलंय की, तिसरा कसोटी सामना पाहत होतो. ओली पोप हा इयानप्रमाणे फलंदाजी करतो, असे मला वाटते. त्याचा फूटवर्क हूबेहूब इयान बेलसारखा वाटला, असे समालोचन त्याने ट्विटच्या माध्यमातून केल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडच्या पहिल्या डावातील पहिल्या दिवशीच्या खेळात पोपने यष्टीरक्षक जोस बटलरच्या साथीने 136 धावांची भागीदारी केली.

रोनाल्डोपेक्षा जास्त गोल; अन् तो मेस्सी नव्हे

दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर तो कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक सहज पूर्ण करेल असे वाटत होते. मात्र गार्बियलने त्याला त्रिफळाचित करत नर्वस नाइंटीजचा शिकार केले. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडला पाचवा धक्का बसला. बटलर-पोप यांच्यात 140 धावांची भागीदारी झाली. दुसऱ्या दिवशी या भागीदारीत फक्त बटलरने जोडलेल्या चारच धावांचा समावेश झाला. आली पोप अवघ्या 9 धावांनी शतकाला मुकावे लागले.  


​ ​

संबंधित बातम्या